शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
4
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
5
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
6
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
7
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
8
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
9
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
10
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
11
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
12
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
13
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
14
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
15
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
16
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
17
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
18
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
19
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
20
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
Daily Top 2Weekly Top 5

स्वयंपाकासाठी गॅसबरोबर चुलीचाही होतो वापर

By admin | Updated: October 10, 2015 00:18 IST

बदलत्या काळानुसार मातीच्या चुलीची जागा आता स्टोव्ह, गॅस तसेच इलेक्ट्रीक शेगड्यांनी घेतली आहे.

घराघरांत गॅस : चुलीचे महत्त्व आजही कायमखांबाडा : बदलत्या काळानुसार मातीच्या चुलीची जागा आता स्टोव्ह, गॅस तसेच इलेक्ट्रीक शेगड्यांनी घेतली आहे. तर स्वयंपाकाचा तसेच व विजेच्या वाढलेला दरामुळे ग्रामीण भागात चुलीचा वापर हा आजही होत आहे. चुलीवरच्या अन्नाची चवही गॅस व इलेक्ट्रीक शेगडीवर बनविलेल्या जेवणात येत नाहीत, असे अनेक जण सांगतात. तीन दगडांवर अग्निच्या सहाय्याने अन्न शिजवून खाण्याचे मानवाला चुलीनेच शिकविले. त्यातून तीन दगडानंतर चुलीचे स्वरुप बदलून तिची जागा मातीच्या चुलीने घेतली.त्यामुळे पुढे ग्रामीण भागात चूल सर्वत्र वापरली जात असत याचा वापर आजही सुरू आहे. भाकरीसाठी पीठ मळायचा घेऊन तव्यात टाकलेल्या दुसऱ्या भाकरीवरुन पाण्याचा हात फिरवल्यानंतर महिला चुलीतील दाटलेला विस्तव बाहेर काढून फुंकारीने फुंकून जाळ लावायच्या व उकरलेल्या आरावर भाकर फिरवायची असा प्रकार आजही ग्रामीण भागात दिसून येते. चुलीमुळे होणारा धूर टाळण्यासाठी पुढे वातीचे स्टोव्ह, बॅनरचे स्टोव्ह, त्यांनतर काही काळ शासनाच्या निर्धर चुलीही आल्या व गेल्या. त्यानंतर शेगड्याच्या जमान्यात भुस्सा, कोळसा एवढेच अन्य इलेस्ट्रीकच्या शेगड्याही आल्या. मात्र सतत संघर्ष करीत का असेना शेगड्या टिकून राहिल्या आहेत. तर आज घराघरांत सिलिंडर पोहोचला असून गॅसचा वापर होत आहे. मात्र त्या घरात चूल पेटत नाही, असे नाही तर चुलीचाही वापर होत आहे. जंगलातून लाकडे आणून चुलीवर स्वयंपाक आजही अनेकांच्या घरी कायम आहे. त्यामुळे चुलीचे मतत्त्व आजही ग्रामीण भागात दिसून येते. (वार्ताहर)