शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

चिताग्नी देण्यासाठीही रॉकेल नाही

By admin | Updated: December 18, 2014 00:53 IST

मानवाच्या जीवनातील शेवटच्या क्षणी देहावसन झाल्यानंतर त्याला अग्नी देऊन किंवा मातीत पुरून दफन केल्या जाते.

भेजगाव : मानवाच्या जीवनातील शेवटच्या क्षणी देहावसन झाल्यानंतर त्याला अग्नी देऊन किंवा मातीत पुरून दफन केल्या जाते. काही गावात जागेअभावी शेड उभारून तिथे अग्नी दिल्या जाते. अग्नी देताना मृतदेह पूर्णपणे जळावा या हेतुने लाकडांसोबत काही ठिकाणी रॉकेलचा वापर केला जातो. मात्र मूल तालुक्यातील भेजगाव येथे माणसाला जीवंतपणी तर, नाहीच मात्र मेल्यानंतरही रॉकेल मिळत नसल्याने गावात रॉकेल विक्रेत्याविरोधात रोष व्यक्त केल्या जात आहे.भेजगाव येथे परवानाधारक तीन विक्रेते आहेत. तिघांकडेही जवळपास महिन्याकाठी आठ ड्रम रॉकेल येते. मात्र परवानाधारक आपल्या स्वार्थासाठी रॉकेलचा काळाबाजार करीत असून त्यामुळे कार्डधारकांना कमी प्रमाणात रॉकेल देत आहे. रॉकेल संपल्याचे सांगून ग्रामस्थांची फसवणूक करीत असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. सध्यास्थितीत गावात बहुतांश नागरिकांकडे वीज बल्बची सोय असल्याने रॉकेल दुकानातुन सोडविण्याचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे लाभधारकांचे रॉकेल महिना ते महिना संबंधित दुकानदाराकडे उपलब्ध असायला पाहिजे.मात्र रॉकेल मिळत नसल्याने कार्डधारकांमध्ये मनस्ताप सहन करावा लागत आहे. आपल्या कार्डवरील रॉकेल दुसऱ्याला विकत असल्याने रॉकेलधारक दुकानदाराविरोधात व प्रशासनावर रोष व्यक्त करीत आहे. सतत वाढत असलेली महागाई बघता रॉकेलचा वापर खाजगी वाहनात होत असल्याने सामान्य माणसाला रॉकेल मिळणे कठिण झाले आहे. चौकशी करून कारवाईची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. मागील आठवड्यात विश्वनाथ शेंडे यांचे देहावसन झाले. त्यांना चिताग्नी देण्याकरिता एकाही दुकानात रॉकेल मिळाले नाही. परिणात: दुसऱ्या ठिकाणाहून रॉकेल मिळवून चिताग्नी द्यावी लागली. अवैध विक्रीकडे लक्ष देवून रॉकेल विक्रेत्यांना समज द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. (वार्ताहर)