चिमूर क्रांती जिल्ह्यासाठी चिमूरकर उभारणार लढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:34 IST2021-02-05T07:34:47+5:302021-02-05T07:34:47+5:30

चिमूर : चिमूर क्रांती जिल्हा निर्माण करणे व चिमूर अप्पर जिल्हा कार्यालय सुरू करणे या विषयावर चिमूर क्रांती जिल्हा ...

Chimurkar will fight for Chimur Kranti district | चिमूर क्रांती जिल्ह्यासाठी चिमूरकर उभारणार लढा

चिमूर क्रांती जिल्ह्यासाठी चिमूरकर उभारणार लढा

चिमूर : चिमूर क्रांती जिल्हा निर्माण करणे व चिमूर अप्पर जिल्हा कार्यालय सुरू करणे या विषयावर चिमूर क्रांती जिल्हा कृती समितीची बैठक हुतात्मा स्मारक चिमूर येथे गजानन अगडे यांच्या अध्यक्षतेत रविवारी पार पडली. चिमूर अप्पर जिल्हा अधिकारी कार्यालय सुरू करण्याची मागणी कृती समितीने बैठकीत केली.

चिमूर येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाची अधिसूचना काढून अनेक दिवसांपासून पद मंजूर केले. अप्पर जिल्हा अधिकारी निशिकांत सुके यांची नेमणूक झाली होती. मात्र बऱ्याच दिवसांपासून चिमूर प्रशासकीय भवनातील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात रुजू झाले नाही. मध्यंतरी चर्चेला पेव फुटले असून ब्रम्हपुरी जिल्हा होणार, या आशयाच्या बातम्या माध्यमात प्रकाशित झाल्या होत्या. त्यामुळे चिमूर जिल्हा कृती समितीने बैठक घेऊन ब्रम्हपुरी जिल्हा तर होणार नाही ना, अशी शंका व्यक्त करण्यात आली.

ब्रम्हपुरीच्या तहसीलदारांनी ब्रम्हपुरी जिल्ह्यासंदर्भात अहवाल शासनाला दिला असल्याने शासन केव्हाही निर्णय फिरवू शकते, असा सूर बैठकीत व्यक्त करण्यात आला. आमदार कीर्तीकुमार भांगडिया, चिमूर अप्पर जिल्हाधिकारी व चिमूर क्रांती जिल्हा निर्मितीसाठी प्रयत्न करीत आहेत. चिमूर येथे ५ जानेवारी २००२ मध्ये चिमूर क्रांती जिल्ह्यासाठी भव्य मोर्चा काढण्यात आला होता. तेव्हा प्रशासकीय भवनाची जाळपोळ होऊन नुकसान झाले होते. त्या स्मरणार्थ व प्रशासनाला मागणीची आठवण करून देण्यासाठी चिमूर जिल्हा कृती समिती दरवर्षी निवेदन देत असते. शासनाच्या नवीन जिल्हा निर्माण अहवालात चिमूरचे नाव आहे. चिमूर क्रांती जिल्हा निर्मितीची बैठकीत रननीती ठरविण्यात आली आहे. पुढील १५ दिवसांत जिल्ह्यासाठी मोर्चा काढण्याचा निर्धार कृती समितीने केला आहे.

यावेळी कृती समितीचे अध्यक्ष नरेंद्र बंडे, प्रा. संजय पिठाडे, धनराज मुंगले, कृष्ण तपासे, बाळकृष्ण बोभाटे, रमेश खेरे, गजानन अगडे, रमेश कराळे, डॉ. हेमंत जांभुळे, अविनाश अगडे, मनोज हजारे, अविनाश रासेकर, प्रफुल्ल कावरे, रमेश दडमल, लिलाबाई नंदरधने, दिवाकर डहारे, मोरेश्वर बांबोडे, अरुण लाडे, पंकज मिश्रा, कलिम शेख, रामदास हेमके, ज्ञानेश्वर जुमनाके, गणपत खोबरे, आदी उपस्थित होते.

Web Title: Chimurkar will fight for Chimur Kranti district