शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

वनसडी परिसरात मिरची पीक करपले

By admin | Updated: October 30, 2015 01:08 IST

कोरपना तालुक्यातील वनसडी परिसरातील बहुतांश शेतकरी मिरचीचे उत्पादन घेतात.

लाखोंचा खर्च व्यर्थ : बोगस बियाणांचा फटकावनसडी : कोरपना तालुक्यातील वनसडी परिसरातील बहुतांश शेतकरी मिरचीचे उत्पादन घेतात. त्यामुळे यावर्षीसुद्धा मिरचीची लागवड करण्यात आली. मात्र बोगस बियाणांचा फटका शेतकऱ्यांना बसल्यामुळे संपूर्ण मिरचीचे पिक पूर्णत: करपून गेल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.दरवर्षी एकरी २० क्विंटल मिरची पिकाचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना यावर्षी मात्र बोगस मिरची बियाणे कंपनीने लाखो रुपयांचा चुना लावला आहे. पुर्वीपासून मिरचीचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या कृषी केंद्रातून बी.एन. आर. बियाणे, आॅक्सी बियाणे हे विनेज कंपनीचे बियाणे आणि सी.५ हे इंडम या कंपनी बियाणे तसेच १०४८ हे सिजेंटा या कंपनीचे बियाणे शेतकऱ्यांनी विकत घेऊन त्यानुसार बियाणांची लागवड करून रोपे लावण्यात आली. बियाणांची लागवड केल्यानंतर उत्पादन चांगले व्हावे, यासाठी या पिकावर शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त खर्च करायला सुरुवात केली. पण लाखो रुपयांचा खर्च करुनसुद्धा संपूर्ण मिरचीचे पिक सुकून गेले आहेत.निसर्गाच्या अवकृपेमुळे अगोदरच शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत.त्यात आता हे नवे संकट उभे ठाकल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. गेल्या २० वर्षांपासून एकरी २० ते ३० क्विंटल मिरची पीक घेणारे शेतकरी यावर्षी पूर्णपणे हतबल झालेले आहेत.या वर्षीच्या हंगामात सर्व बियाणे कंपन्यांनी मिरचीचे बोगस बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारून त्यांची फसवणूक केली आहे. यासंदर्भात सर्व संबंधित शेतकऱ्यांनी एकत्र येऊन कोरपना येथील कृषी अधिकाऱ्यांना निवेदन देऊन नुकसान भरपाईची मागणी केली आहे. यासोबतच शेतकरी संघटनेचे नेते माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप यांनादेखील निवेदन देण्यात आले. करपलेल्या मिरची पिकाची पाहणी करुन आम्हाला बियाणे कंपन्यांकडून मोबदला मिळावा, यासाठी प्रयत्न करावे, अशी मगणी केली आहे. संबंधित कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी शेतात जावून मिरची पिकाची पाहणी करावी व एकरी १० लाख रुपयांची नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. (वार्ताहर)मी गेल्या १० वर्षांपासून पाच ते १० एकर मिरचीचे उत्पन्न घेत आहे. दरवर्षी मला एकरी २० ते २५ क्विंटल उत्पादन मिळते. पण यावर्षी मिरची पिकावर लाखो रुपये खर्च करुनसुद्धा मिरचीची रोपे पूर्णपणे करपून गेली आहेत. या परिसरात पाच ते १० एकर मिरची पीक घेणारे शेतकरी आहेत. कंपनीने आम्हास योग्य तो मोबदला द्यावा, अशी आमची मागणी आहे.- डॉ. देवराव ठावरी, शेतकरी, वनसडी