शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
3
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
4
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
5
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
6
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
7
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
8
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
9
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
10
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
11
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
12
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
13
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
14
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
15
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
16
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
17
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
18
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
19
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
20
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

लहान मुलांची तब्येत बिघडली; ओपीडीमध्ये तिप्पट वाढ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:32 IST

चंद्रपूर : कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त होत असतानाच लहान मुलांच्या आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत. जिल्हा सामान्य ...

चंद्रपूर : कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त होत असतानाच लहान मुलांच्या आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयातील ओपीडीसह खासगी रुग्णालयांच्या ओपीडीमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण दिसून येत आहेत. यामध्ये जीवघेण्या तापाचेसुद्धा रुग्ण असल्याने काळजी घेण्याचे आवाहन बालरोग तज्ज्ञांनी केले आहे.

दरवर्षी पावसाळ्यात लहान मुलांना सर्दी, खोकला, ताप ही लक्षणे दिसून येतात. मात्र मागील वर्षी आलेल्या कोरोनाने दहशत पसरली आहे. तिसऱ्या लाटेचा धोका लहान मुलांना होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यातच डेंग्यू, मलेरिया, मेंदुज्वर आदी प्राणघातक तापाचे रुग्ण आढळून येत आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयासह खासगी ओपीडीतसुद्धा रुग्ण वाढले असल्याचे दिसून येते.

बॉक्स

बालरोगतज्ज्ञ म्हणतात..

पावसाळ्यात सर्दी, खोकला, ताप आदी समस्या लहान मुलांना जाणवतच असतात. परंतु, आता डेंग्यू, मेंदुज्वर, मलेरिया अशी जीवघेण्या आजाराचे रुग्णसुद्धा मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. कुटुंबीयांनी काळजी घेतली तरी प्रशासनाकडूनही या जीवघेण्या तापाचा बंदोबस्त करण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. मेंदुज्वर हा अत्यंत भयावह आहे. यामध्ये बाळ दगावण्याची किंवा वेळीच उपचार न झाल्यास मतिमंद होण्याची शक्यता असते. त्यामुळे त्याचे लसीकरण गरजेचे आहे. गडचिरोलीसारख्या जिल्ह्यात मागील काही वर्षांपासून लहान मुलांना मेंदुज्वराचे लसीकरण करण्यात येत आहे. परंतु, आपल्या जिल्ह्यात अशी कुठल्याही प्रकारची योजना राबविताना दिसून येत नाही.

- डॉ. अभिलाषा गावतुरे, बालरोगतज्ज्ञ, चंद्रपूर

बॉक्स

डेंग्यू, मलेरिया चाचणी

शासकीय रुग्णालयात तसेच खासगी रुग्णालयातील ओपीडीमध्ये येत असलेल्या लहान मुलांमध्ये सर्दी, खोकला, हगवण, साधा ताप यासह डेंग्यू, मलेरिया या जीवघेण्या आजारांची लक्षणे आढळून येत आहेत. त्यामुळे संशयित लक्षणे असताच डाॅक्टरांकडून डेंग्यू, मलेरियाची चाचणी करावयास सांगितले जात आहे. सद्यस्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयासह खासगी रुग्णालयात गर्दी दिसून येत आहे.

बॉक्स

संशयितांची कोरोना चाचणी

शासकीय किंवा खासगी रुग्णालयात उपचारासाठी आलेली मुले संशयित आढळून आल्यास त्यांची कोरोना चाचणी करण्यात येते.

शक्यतो मोठ्या माणसांपासून लहान मुलांना कोरोना होण्याची शक्यता असते. त्यामुळे काळजी घेण्याचे आवाहन बालरोग तज्ज्ञांनी केले आहे.

बॉक्स

..ही घ्या काळजी

ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. सायंकाळच्या सुमारास झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा. घरात कुणाला ताप आला असेल तर त्यांच्यापासून लहान मुलांना दूर ठेवावे.