शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
2
Election Results 2026 LIVE: ५ राज्यांमध्ये 'सत्ता'धीश कोण?, आज होणार फैसला; पश्चिम बंगालकडे सगळ्यांचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
4
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
5
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
6
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
7
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
8
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
9
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
10
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
11
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
12
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
13
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
14
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
15
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
16
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
17
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
18
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
19
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
20
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
Daily Top 2Weekly Top 5

मूल पालिकेचे सार्वजनिक वाचनालय झाले पोरके

By admin | Updated: July 17, 2017 00:37 IST

येथील नगर परिषदेने स्व. इंदिरा गांधी सार्वजनिक वाचनालय सुरू केले. मूल शहरात वाचन संस्कृतीला चालना मिळेल,

लाखोंची पुस्तके गायब : इमारतीचेही निघाले धिंडवडेलोकमत न्यूज नेटवर्कमूल : येथील नगर परिषदेने स्व. इंदिरा गांधी सार्वजनिक वाचनालय सुरू केले. मूल शहरात वाचन संस्कृतीला चालना मिळेल, असा यामागे हेतू होता. मात्र या वाचनालयाकडे पालिका प्रशासनाने सातत्याने दुर्लक्ष केल्याने वाचनालय सध्या अडगळीत निघाले आहे. लाखो रुपयांची खरेदी केलेली अमुल्य पुस्तके कुठे गेली, त्याचा पत्ता नाही. दुसरीकडे इमारतीचेही धिंडवडे निघाले असून लोखंडी दारे व खिडक्या अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याने इमारतीसह साहित्याचा खजिना पोरका झाला आहे.नगर परिषद मूलची स्थापना १० सप्टेंबर १९८७ ला झाली. त्यापूर्वीपासून म्हणजे ग्रामपंचायत काळापासून स्व.इंदिरा गांधी सार्वजनिक वाचनालय सुरू करण्यात आले. या वाचनालयात विविध साहित्यिकांचे पुस्तके, कादंबऱ्यासह आत्मचरित्र व अनमोल ग्रंथही होते. यामुळे पूर्वी वाचनालयात वाचकांची गर्दी पहायला मिळायची. ताज्या घडामोडीची वाचकांना माहिती मिळावी म्हणून नियमित विविध वर्तमानपत्र मागविली जायची. मात्र नावारूपास आलेल्या या सार्वजनिक वाचनालयाला आता उदासीनतेचे ग्रहण लागले आहे. वाचनालयातील पुस्तकांची वाढ करणे आवश्यक असताना पालिकेला ते महत्त्वाचे वाटले नाही. या उदासिनतेमुळे वाचनालय अडगळीत पडले आहे. कर्मचाऱ्यांवर वचक नसल्याने व कामाच्या बिलासाठी झटणाऱ्या न.प. प्रशासनाबरोबरच पदाधिकाऱ्यांनाही साहित्याच्या खजिन्याविषयी सोयरसूतक वाटले नाही. सदर वाचनालय आता जुगाऱ्यांचे आश्रयस्थान बनले आहे. येथे हजारो रुपयांचा जुगार खेळला जात असतानाही नगर पालिका याकडे दुर्लक्ष करीत आहे. सदर वाचनालय सुरू राहावे, यासाठी कुणीही पुढाकार घेतला नसल्याने आजच्या स्थितीत नगर पालिकेच्या इमारतीचे धिंडवडे निघाले आहे. याकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे.‘त्या’ ठिकाणी शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारणार तालुक्यातील नागरिकांमध्ये असलेली वाचनसंस्कृती कायम टिकून राहावी, यासाठी श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय मूल शहरात सुरू करण्यात आले आहे. नगर पालिकेचे स्व. इंदिरा गांधी सार्वजनिक वाचनालय तत्कालीन न.प. प्रशासनाने बंद केले. त्या ठिकाणी असलेली रंगमंचाची इमारत पाडून येणाऱ्या काळात शापिंग कॉम्प्लेक्स उभारण्याचा आमचा प्रयत्न राहील, अशी प्रतिक्रिया मूल नगर पालिकेचे उपाध्यक्ष नंदू रणदिवे यांनी दिली.