शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
3
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
4
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
5
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
6
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
7
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
8
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
9
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
10
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
11
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
12
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
13
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
14
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
15
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
16
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
17
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
18
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
19
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
20
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
Daily Top 2Weekly Top 5

मुस्लीम आरक्षणावर मुख्यमंत्र्यांची भूमिका अन्यायकारक

By admin | Updated: January 28, 2015 23:12 IST

राज्यातील तत्कालिन सरकारने मराठा समाजाला १६ टक्के आणि मुस्लीम समाजाला पाच टक्के आरक्षण जाहीर केले होते. मात्र मुस्लिमांच्या आरक्षणाबद्दल विद्यमान मुख्यमंत्र्यांची भूमिका अन्यायकारक

उद्या आरक्षण मोर्चा : मुस्लीम संघर्ष समितीचा आरोपचंद्रपूर : राज्यातील तत्कालिन सरकारने मराठा समाजाला १६ टक्के आणि मुस्लीम समाजाला पाच टक्के आरक्षण जाहीर केले होते. मात्र मुस्लिमांच्या आरक्षणाबद्दल विद्यमान मुख्यमंत्र्यांची भूमिका अन्यायकारक असल्याचा आरोप मुस्लीम हक्क संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी येथे पत्रकार परिषदेत केला.मुस्लिमांच्या आरक्षणाच्या मागणीसाठी आणि समाजाच्या विविध समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी २९ जानेवारीला चंद्रपुरात मोर्चाही काढण्यात येणार आहे. पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले मुस्लीम हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष हाजी सैयद अनवर अली, समन्वयक सैयद आबीद अली, मुस्ताक कुरेशी आदींनी आपली मते व्यक्त केली. पदाधिकारी म्हणाले, सच्चर कमेटीने केलेल्या सिफारशी लागू करण्याची गरज आहे. बऱ्याच कालावधीनंतर पाच टक्के आरक्षण देऊन अंमलबजावणीची घोषणा होण्याची चिन्हे दिसत असतानाच विद्यमान सरकारने मात्र हे आरक्षण गोठविले. शासनाच्या धोरणाचा निषेध व्यक्त करून ते म्हणाले, मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळासाठी एक कोटी रूपयांची तरतुद करण्याची आवश्यकता आहे. डॉ. मेहमूद रहमान समितीच्या शिफारशी सरकारने लागू कराव्यात. समाजाचा आर्थिक आणि शैक्षणिक स्तर खालावलेला असताना सरकारने भूमिका न घेणे हा अन्याय आहे. न्या. मिश्रा समिती, रंगनाथ समिती, सच्चर समिती, मेहमूद रहमान समितीच्या शिफारसी लागू करून या समाजाला विकासाच्या प्रवाहात आणण्याची गरज आहे. ६५ वर्षांनतर काँग्रेस सरकारला मुस्लीमांच्या समस्यांबद्दल जाग आली होती. मात्र मुस्लीमविरोधी असलेल्या भाजपा सरकारने पाच टक्के आरक्षणही हिसकावले, अशी खंत यावेळी व्यक्त करण्यात आली. या समस्येकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील मुस्लीम बांधवांचा मोर्चा २९ जानेवारीला काढला जाणार आहे. सकाळी ११ वाजता गांधी चौकातून मोर्चा निघून जिल्हाधिकारी कार्यालयावर जाईल. त्यानंतर दर्गा मैदानावर जाहीर सभा होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. पत्रकार परिषदेला फिरोज खान, आशिक हुसेन, अकबर शेख आदी उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)