ईदच्या मिरवणुकीने चंद्रपूर दुमदुमले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2019 05:00 AM2019-11-11T05:00:00+5:302019-11-11T05:01:04+5:30

ईद ए मिलादुन्नबी चंद्रपूरसह जिल्ह्यात मोठ्या हर्षोउल्लासात साजरा झाला. ईद ए मिलादुन्नबीनिमित्त चंद्रपुरात शनिवारपासूनच उत्साहाचे वातावरण होते. दरम्यान, शुक्रवारी सकाळी चंद्रपुरातील प्रमुख मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली. हजारो मुस्लिम बांधव मिरवणुकीत सहभागी झाले होते. या मिरवणुकीने शहर दुमदुमले.

Chandrapur shuddered at the Eid procession | ईदच्या मिरवणुकीने चंद्रपूर दुमदुमले

ईदच्या मिरवणुकीने चंद्रपूर दुमदुमले

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्हाभरातही विविध कार्यक्रम : हिंदू-मुस्लीम बांधवांमध्ये एकात्मतेचे दर्शन

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : इस्लाम धर्माचे धर्मगुरु मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस ईद ए मिलादुन्नबी चंद्रपूरसह जिल्ह्यात मोठ्या हर्षोउल्लासात साजरा झाला. ईद ए मिलादुन्नबीनिमित्त चंद्रपुरात शनिवारपासूनच उत्साहाचे वातावरण होते. दरम्यान, शुक्रवारी सकाळी चंद्रपुरातील प्रमुख मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली. हजारो मुस्लिम बांधव मिरवणुकीत सहभागी झाले होते. या मिरवणुकीने शहर दुमदुमले.
यावेळी हिंदू, मुस्लीम बांधवांनी एकमेकांना आलिंगन देऊन एकात्मतेचा परिचय दिला. ईद ए मिलादनिमित्त शुक्रवार सकाळपासूनच चंद्रपुरात उत्साहाचे वातावरण होते. मिरवणुकीची सुरुवात सकाळी १० वाजता गांधी चौकातून करण्यात आली. जटपुरा गेट, प्रियदर्शिनी इंदिरा गांधी चौकातून परत जटपुरा गेट, गिरणार चौक अशी मिरवणूक फिरल्यानंतर दारुल मोहम्मदिया मस्जिद दादमहल वॉर्ड येथे विसर्जित झाली. या मिरवणुकीत हजारो मुस्लीम बांधव सहभागी झाले होते. मिरवणुकीनंतर सर्वांनी लंगरचा लाभ घेतला. जिल्ह्यातील अनेक शहरातही ईद ए मिलादनिमित्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

मिरवणुकीचे ठिकठिकाणी
स्वागत

मिरवणुकीच्या स्वागतासाठी मंगळवारी रात्रीच प्रमुख मार्गावर मंच उभारण्यात आले होते. शुक्रवारी मिरवणूक निघताच विविध सामाजिक संस्था व राजकीय पक्षाच्या वतीने मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले. यावेळी मसालेभात व सरबतही वितरण करण्यात आले. काही जणांनी रस्त्यावर ठिकठिकाणी पाण्याची व्यवस्था केली होती.

युवकांची स्वच्छता मोहीम
मिरवणुकीदरम्यान होणारा कचरा तत्काळ स्वच्छ करण्यासाठी युवकांची एक चमू कार्यरत होती. मिरवणूक ज्या मार्गावरून गेली, त्या मार्गावर हे युवक स्वच्छता मोहीम राबवित होते. त्यामुळे मिरवणूक विसर्जित झाल्यानंतर लगेच शहर स्वच्छ दिसत होते.

मिरवणुकीचे जोरगेवारांकडून स्वागत
मुस्लीम बांधवांतर्फे शहराच्या मुख्य मार्गाने काढण्यात आलेल्या शोभायात्रेचे चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांनी कस्तुरबा मार्गावर स्वागत केले. यावेळी, आमदार जोरगेवार यांनी या शोभायात्रेमध्ये सहभागी झालेल्या सर्व मौलाना यांचे पुष्पहार, शॉल देऊन स्वागत केले. तसेच, सर्व मुस्लीम बांधवांना ईद-ए-मिलादुन्नबीच्या शुभेच्छा दिल्या. तसेच, यावेळी शोभायात्रेत सहभागी झालेल्या मुस्लिम समाज बांधवांना आयस्क्रिम वाटप करण्यात आले. याप्रसंगी, अनवर अली, राशीद हुसैन, इमरान शेख, शफीक काजी, खालीद खान, जावेद खान, अशपाक खान, सलीम शेख, राजिक खान आदींची उपस्थिती होती.

Web Title: Chandrapur shuddered at the Eid procession

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.