शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
4
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
5
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
6
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
7
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
8
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
9
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
10
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
11
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
13
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
14
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
15
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
16
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
17
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
18
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
19
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
20
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन

Chandrapur Lok Sabha Results 2024 : महिला काँग्रेसने उधळला गुलाल; डिजेच्या तालावर धरला ठेका

By परिमल डोहणे | Updated: June 4, 2024 15:53 IST

Chandrapur Lok Sabha Results 2024 : धानोरकरांनी लाखांच्या जवळपास आघाडी घेताच महिला काँग्रेसने गुलाल उधळला

परिमल डोहणे, चंद्रपूर Chandrapur Lok Sabha Results 2024 : पोस्टल मताच्या मोजणीपासून काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांनी आघाडी घेतली. दरम्यान सुधीर मुनगंटीवार पिछाडीवर होते. सहाव्या फेरीत लाखांच्या जवळपास आघाडी घेताच महिला काँग्रेसने गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी डीजेच्या तालावर महिला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी ठेका धरून एकमेकांना गुलाल लावला.

निवडणूक झाल्यापासून चंद्रपुरातील निवडणूक अत्यंत अटीतटीची होईल, अशी चर्चा सुरू होती. मात्र मतमोजणीला सुरुवात होताच हा कयास खोटा ठरला. पोस्टल मताच्या मोजणीपासून प्रतीभा धानोरकर यांनी आघाडी घेतली होती. सहाव्या फेरीतच लाखाच्या जवळपास लीड जाताच काँग्रेस कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी फटाके फोडून जल्लोष साजरा करत होत्या. दरम्यान बाबूपेठ येथे महिला काँग्रेसच्या शहर अध्यक्ष चंदा वैरागडे यांच्या नेतृत्वात गुलाल उधळण्यात आला. एवढेच नाही तर डीजेच्या तालावर महिला कार्यकर्त्यांनी ठेका धरला. एकमेकांना गुलाल लावून आनंदोत्सव साजरा केला होता.

२०१९ मध्ये पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचे उमेदवार बाळू धानोरकर हे निवडून आले होते. ते महाराष्ट्रातील काँग्रेसचे एकमेव खासदार होते. तत्कालीन केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांचा त्यांनी पराभव केला. बाळू धानोरकर यांना ५ लाख ५९ हजार ५०७ तर हंसराज अहीर यांना ५ लाख १४ हजार ७४४, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राजेंद्र महाडोळे यांना १ लाख १२ हजार ७९ मते मिळाली होती. या निवडणुकीमध्ये १३ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. ११ हजार ३७७ मतदारांनी नोटाला पसंती दिली. विशेष म्हणजे, बाळू धानोरकर हे वरोरा विधानसभा क्षेत्राचे शिवसेनेचे आमदार होते. त्यांनी निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेसमध्ये प्रवेश घेतला आणि उमेदवारीही मिळविली होती. मात्र, दुर्दैवाने त्यांचे मागील वर्षी निधन झाले. त्यानंतर पोटनिवडणुकीचीही चर्चा रंगली होती. भाजपचे हंसराज अहीर यांनी चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचे चार वेळा नेतृत्व केले.

टॅग्स :lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४chandrapur-acचंद्रपूरSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारcongressकाँग्रेसBJPभाजपा