सिंचन विहिरींची प्रकरणे निकाली काढावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:56 IST2020-12-11T04:56:34+5:302020-12-11T04:56:34+5:30

समाज मंदिराचे प्रशासनाचे दुर्लक्ष चंद्रपूर : जिल्ह्यातील बहुतांश समाजमंदिराकडे संबंधित अधिकारी लक्ष देत नसल्याने ते दुर्लक्ष झाले आहे. ...

Cases of irrigation wells should be disposed off | सिंचन विहिरींची प्रकरणे निकाली काढावे

सिंचन विहिरींची प्रकरणे निकाली काढावे

समाज मंदिराचे प्रशासनाचे दुर्लक्ष

चंद्रपूर : जिल्ह्यातील बहुतांश समाजमंदिराकडे संबंधित अधिकारी लक्ष देत नसल्याने ते दुर्लक्ष झाले आहे. काही समाजमंदिराच्या खिडक्या चोरीला गेल्या आहे. ज्या उद्देशासाठी शासनाने समाजमंदिरांची उभारणी केली त्या उद्देशाला बगल दिली जात आहे. त्यामुळे या समाजमंदिराकडे लक्ष देण्याची मागणी सामाजिक संस्थेनी केली आहे.

रस्ते सफाईनंतर माती पुन्हा रस्त्यावरच

चंद्रपूर : चंद्रपूर महानगर पालिकेचे सफाई कर्मचारी दररोज सकाळी न चुकता शहरातील रस्त्यांची सफाई करतात. दरम्यान, रस्त्यावर असलेली धूळयुक्त माती रस्त्याच्या कडेला वा रस्ते दुभाजकाच्या कडेला जमा करतात. मात्र ती माती नंतर उचलल्या जात नाही. यानंतर पुन्हा वर्दळीला सुरूवात होते. वाहनांमुळे ती माती पुन्हा रस्त्यावर पसरत आहे.

चंद्रपुरातील पाणी पुरवठा सुरळीत करा

चंद्रपूर : शहरात एक दिवसाआड पाणी पुरवठा सुरू आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. मनपाच्या बैठकीत नियमित पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण, समस्या सुटली नाही. दिवाळी असतानाही काही वार्डातील नागरिकांना पाणण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. काही प्रभागात नळाद्वारे अत्यंत कमी पाणी सोडले जाते. अर्धा-एक तासातच नळाची धार बारिक होते.

Web Title: Cases of irrigation wells should be disposed off