शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

परवाना नसतानाही सोयाबीन खरेदी

By admin | Updated: November 4, 2014 22:36 IST

परिसरातील काही व्यापारी शेतकऱ्यांचे सोयाबीन विना परवाना खरेदी करीत असल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीला मोठा फटका बसत आहे. या प्रकाराकडे प्रशासनाचे सोयीस्कर दुर्लक्ष अन्

प्रशासनाचे दुर्लक्ष : बाजार समितीला फटकाकोरपना : परिसरातील काही व्यापारी शेतकऱ्यांचे सोयाबीन विना परवाना खरेदी करीत असल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीला मोठा फटका बसत आहे. या प्रकाराकडे प्रशासनाचे सोयीस्कर दुर्लक्ष अन् कर्मचाऱ्यांच्या देवघेवी वृत्तीमुळे या प्रकारात कमालीची वाढ झाली आहे. शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी करण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचा परवाना व्यापाऱ्यांजवळ असणे गरजेचे आहे. अशा परवानाधारक व्यापाऱ्यांनाच बाजार समितीच्या परिसरातून (वॉर्डातून) शेतमालाची खरेदी करता येते. समितीच्या वॉर्डात खरेदी केलेला शेतमाल बाहेर नेतांना व्यापाऱ्यानी एकूण शेतमालाच्या खरेदी राशीवर प्रती शेकडा १ रुपया ०५ पैसे सेस बाजार समितीला देणे बंधणकारक आहे. असे असताना येथील काही व्यापारी सेस राशी तसेच चार टक्के विक्रीकर वाचविण्याकरिता मंडीत अथवा बाजारात, वॉर्डात खरेदी न करता मोठ्या प्रमाणावर खाजगीत खरेदी करीत आहेत. ही बाब येथील प्रशासक व बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांना माहित असूनसुद्धा त्यांचे याकडे दुर्लक्ष होत आहे. संगनमताने हा गौरप्रकार गेल्या काही दिवसांपासून बिनबोभाटपणे सुरु आहे.येथील बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मुदत संपल्याने शासनाने येथे प्रशासक नियुक्त केला आहे. या प्रशासकाकडे कोरपना, राजुरा व गोंडपिपरी या तीन बाजार समित्यांचा प्रभार आहे. नेमकी ही बाब हेरुन गैरप्रकारास सुरुवात झाली आहे. यंदा दिवाळीपूर्वीच काही शेतकऱ्यांचे सोयाबीन हाती आले. मात्र व्यापाऱ्यांचा फायदा व्हावा या हेतुने कोरपना येथे ३१ आॅक्टोबरला तर गडचांदूरात ३ नोव्हेंबरला समितीने खरेदी सुरु केल्याचा आरोप आहे. कोरपना येथे पाच दिवसात ३०० पोते तर गडचांदुरात दोन दिवसात अवघे १८७ पोते सोयाबीनची खरेदी झाली. तर दुसरीकडे खासगी व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानात किमान १० हजार क्विंटलची खरेदी केल्याची माहिती आहे.गोदाम तपासणी केल्यास त्याचा उलगडा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या व्यवहारात बाजार समितीचा संबंध येत नसल्याने कोट्यवधीच्या या व्यवहारात समितीला कुठलेही उत्पन्न मिळत नाही. या प्रकारामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. (तालुका प्रतिनिधी)