ब्रह्मपुरीच्या मध्यवर्ती परिसरात घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2020 06:00 AM2020-01-16T06:00:00+5:302020-01-16T06:00:26+5:30

येथील राजेश्वर विधाते हे मंगळवारला रात्री ८ वाजेच्या सुमारास कुटुंबबियासह बाहेरगावी गेले. घरी कुणीही नसल्याचा फायदा घेऊन चोरटयांनी मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास राजेश्वर विधाते यांच्या रुक्मिणीनगर स्थित असलेल्या घराचे दरवाजे तोडून घरात प्रवेश केला. घरातील दुचाकी व २० हजार रुपये लंपास केले. विशेष म्हणजे, सदर चोरटयाने स्वत:चे कपडे, जोडे व जॅकेट चोरी केलेल्या ठिकाणी काढून ठेवले आणि त्या घरच्या मुलाचे जॅकेट व कपडे घालून चोरटे निघून गेले.

Burglary in the central area of Brahmapuri | ब्रह्मपुरीच्या मध्यवर्ती परिसरात घरफोडी

ब्रह्मपुरीच्या मध्यवर्ती परिसरात घरफोडी

Next
ठळक मुद्देचोरट्यांनी कपडेही बदलले : दुचाकीसह २० हजार लंपास

लोकमत न्यूज नेटवर्क
ब्रम्हपुरी : शहरातील मध्यवर्ती पेठवार्डातील रुक्मिणीनगर भागातील भरवस्तीत मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरटयांनी घर फोडून होंडा कंपनीची शाईन दुचाकी व नगदी २० हजार रुपये लंपास केले. तसेच चोरटयाने स्वत:चे कपडे, जोडे व जॅकेट काढून ठेवून फोडलेल्या घरच्या मुलाचे जॅकेट व कपडे घालून निघून गेले. त्यामुळे पुरावा सोडून चोरटयांनी घरफोडी केल्याची विचित्र घटना ब्रम्हपुरीत घडली.
येथील राजेश्वर विधाते हे मंगळवारला रात्री ८ वाजेच्या सुमारास कुटुंबबियासह बाहेरगावी गेले. घरी कुणीही नसल्याचा फायदा घेऊन चोरटयांनी मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास राजेश्वर विधाते यांच्या रुक्मिणीनगर स्थित असलेल्या घराचे दरवाजे तोडून घरात प्रवेश केला. घरातील दुचाकी व २० हजार रुपये लंपास केले. विशेष म्हणजे, सदर चोरटयाने स्वत:चे कपडे, जोडे व जॅकेट चोरी केलेल्या ठिकाणी काढून ठेवले आणि त्या घरच्या मुलाचे जॅकेट व कपडे घालून चोरटे निघून गेले. बुधवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. बाजुच्या नागरिकाला घरात चोरी झाल्याचे कळताच त्यांनी बाहेरगावी गेलेल्या घर मालकाला भ्रमणध्वनीवरून याची माहिती दिली.
माहिती मिळताच सदर कुटुंब ताबडतोब ब्रह्मपुरीला पोहोचले आणि एकंदरीत परिस्थिती पाहून ब्रह्मपुरी पोलीस स्टेशनमध्ये रितसर तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुध्द कलम ४५७, ३८० अन्वये गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, पोलिसांनी चंद्रपूरवरून श्वानपथकाला व ठसे तज्ज्ञांना पाचारण केले. घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सय्यद व अमोल गिरडकर करीत आहेत.

Web Title: Burglary in the central area of Brahmapuri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Thiefचोर