शहरं
Join us  
Trending Stories
1
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
2
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
3
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
4
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
5
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
6
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
7
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
8
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
9
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
10
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
11
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
12
बाबा वेंगाची सोन्याबाबत मोठी भविष्यवाणी; पाहा आता दरांबाबत काय म्हटलंय? खरं झालं तर...
13
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले...
14
"तुमच्यापाशी दुसरा तुल्यबल विचारच नाही..."; कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या सूनेने संजय गायकवाडांना सुनावले
15
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला; आमदार-प्रकाशक संघर्षातून राज्यात नवे राजकीय वादळ
16
'भुजिया किंग' शिवरतन अग्रवाल यांचे निधन; शुन्यातून उभारले हजारो कोटींचे साम्राज्य...
17
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
18
Gondia Crime: 'तुला जिवे मारीन' म्हणत हात-पाय बांधून शाळेत डांबले; लग्नासाठी अल्पवयीन मुलीचे अपहरण
19
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
20
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्या दिवशीही चालला बुलडोजर

By admin | Updated: December 30, 2016 01:39 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार चंद्रपूर शहरातील अनधिकृत ठरविण्यात आलेली धार्मिक स्थळे

चंद्रपुरात मोहीम : पाच अतिक्रमित धार्मिक स्थळे भुईसपाट चंद्रपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार चंद्रपूर शहरातील अनधिकृत ठरविण्यात आलेली धार्मिक स्थळे हटविण्याची मोहीम चंद्रपूर मनपा प्रशासनाकडून बुधवारपासून सुरू आहे. गुरूवारी मोहिमेच्या दुसऱ्या दिवशीही पाच अनाधिकृत धार्मिक स्थळांवर बुलडोजर चालवून भुईसपाट करण्यात आले. दरम्यान दे. गो. तुकूम येथील सत्वाचा मारोती मंदिर हटविताना काही काळ तणाव निर्माण झाला होता. सकाळपासून सुरू झालेल्या या कारवाईत दिवसभरात तुकूम परिसरातील पाच अनधिकृत धर्मस्थळांना भूईसपाट करण्यात आले. यामध्ये निर्माणनगरातील मातामंदिर, राधाकृष्ण मंदिर, वैद्यनगरातील माता मंदिर, दे.गो. तुकूम येथील नाग मंदिर व सत्वाचा मारोती मंदिराचा समावेश आहे. सकाळपासून कारवाई सुरू असताना सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास सत्वाचा मारोती मंदिर येथे मनपाचे वरिष्ठ अधिकारी, बुलडोजर, अग्नीशामक दलाचे वाहन, सफाई कर्मचारी, पोलीस शिपाई, वाहतूक पोलीस दाखल झाले. यावेळी नागरिकांनीही मोठी गर्दी केली. त्यामुळे पोलिसांनी एका बाजुची वाहतूक वळवून रस्ता बंद केला. यामुळे दुर्गापूरकडे जाणाऱ्या-येणाऱ्यांना वाहन काढण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागली. चंद्रपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रल्हाद गिरी, दुर्गापूरचे ठाणेदार सिंगनजुडे यांच्यासह मनपा आयुक्त संजय काकडे, उपायुक्त डॉ. विजय इंगोले व अन्य मनपा अधिकारीही घटनास्थळी हजर होते. दरम्यान, मंदिरासमोर सभामंडप टाकून महिला व पुरूष मंदिर हटविण्याच्या घटनेचा निषेध करण्यासाठी बसले होते. मंदिर कमिटीच्या सदस्यांशी चर्चा केल्यानंतर मंदिर पाडण्याची कारवाई करण्यात आली. सायंकाळनंतर ही कारवाई थांबली असली तरी, उद्या शुक्रवारीही सकाळीपासूनच अतिक्रमण हटाव कारवाई सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे उर्वारित अनधिकृत धर्मस्थळे शुक्रवारीच्या अतिक्रमण हटाव कारवाईत भुईसपाट होणार आहेत. (स्थानिक प्रतिनिधी) चर्चेनंतर कारवाई करण्यास होकार सत्वाचा मारोती मंदिर पाडताना नागरिकांचा मोठा जमाव निर्माण झाला होता. मंदिर कमिटी व इतर नागरिकांचा रोष पाहता मनपा आयुक्त काकडे व अन्य अधिकाऱ्यांनी मंदिर कमिटीच्या सदस्यांशी चर्चा केली. या चर्चेनंतर अतिक्रमण हटविण्यास सदस्यांनी होकार दिला. त्यांनीच मंदिर कमिटीच्या अन्य सदस्यांना ध्वनीक्षेपकाद्वारे पालिका प्रशासनाला कारवाई करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. त्यामुळे अतिक्रमण हटाव पथकाने दोन तासानंतर मंदिर पाडण्याची कारवाई केली.