शहरं
Join us  
Trending Stories
1
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
2
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
3
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
4
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
5
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
6
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
7
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
8
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
9
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
10
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
11
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
12
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
13
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
14
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
15
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
16
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
17
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
18
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
19
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
20
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
Daily Top 2Weekly Top 5

सास्ती-गोवरी क्षेत्रात उमेदवारीसाठी इच्छुकांची भाऊगर्दी

By admin | Updated: December 31, 2016 02:14 IST

राजुरा तालुक्यातील चार जिल्हा परिषद क्षेत्रांपैकी सास्ती-गोवरी जिल्हा परिषद क्षेत्र सर्वसाधारण असल्याने या क्षेत्राकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

जि.प. निवडणूक : उमेदवारी मिळविण्यासाठी जीवाचा आटापिटा गोवरी : राजुरा तालुक्यातील चार जिल्हा परिषद क्षेत्रांपैकी सास्ती-गोवरी जिल्हा परिषद क्षेत्र सर्वसाधारण असल्याने या क्षेत्राकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. कालपर्यंत या कार्यकर्त्यांना पक्षाचा काही लवलेशही नव्हता. ते कार्यकर्ते आपल्या पक्षाकडे उमेदवारी मागायला लागले आहे. त्यामुळे या क्षेत्रासाठी उमेदवारांची लांबलचक यादी पहायला मिळत आहे. बहुतांश उमेदवार येथील स्थानिक रहिवासी असल्याने या क्षेत्राची निवडणूक चुरशीची होणार आहे. पक्षश्रेष्ठींकडे उमेदवारी मिळविण्यासाठी सर्वांनीच कंबर कसली असून उमेदवारीसाठी इच्छुकांची भाऊगर्दी झाली आहे. सास्ती-गोवरी जि.प. क्षेत्रात बहुतांश भाग हा औद्योगिक क्षेत्र म्हणून ओळखला जातो. या भागात वेकोलि या भूमिगत व खुल्या कोळसा खाणी आहेत. वेकोलिने परिसरात विकासकामे केली आहे. बहुतांश मतदार कोळसा खाणीत नोकरीवर असल्याने आर्थिक बाजू भक्कम आहे. परंतु नदी पड्यातील नागरिकांना अजूनही विकासकामांची आस लागली आहे. नदी पटयातील बहुतांश गावे आजही विकासापासून दूर असून गावात मूलभूत सोयी - सुविधांचा अभाव आहे. लोकप्रतिनिधींची उदासीनता जबाबदार असल्याचे आता नागरिकांकडून बोलले जात आहे. अक्षरश: ग्रामीण भागात विकास कामांचा खेळखंडोबा झाला आहे. जबाबदार लोकप्रतिनिधी या भागाला मिळावा, अशी आशा नागरिक बाळगून आहे. येत्या काही दिवसात जि.प. निवडणुकींची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील राजकीय वातावरण चांगलेच तापायला लागले आहे. सर्वच राजकीय पक्ष उमेदवारांच्या चाचपणीसाठी दिवसरात्र बैठका घेत आहे. कोणता उमेदवार पक्षासाठी सरस ठरेल, याचे राजकीय गणीत पक्षश्रेष्ठी ठरवणार आहे. उमदेवारांनी आता मतदारांच्या गाठीभेटी घ्यायला सुरुवात केली आहे. कधीही मतदारांकडे ढूंकूनही न पाहणारे उमेदवार मतदारांच्या सुखदु:खात सहभागी होताना दिसत आहे. सास्ती-गोवरी या क्षेत्राकडे सर्वच राजकीय पक्षांनी चांगलीच फिल्डींग लावली आहे. या क्षेत्रात भाजपातर्फे गोवरीचे विद्यमान सरपंच सुनिल उरकुडे, साखरीचे राजू घरोटे तर मधुकर नरड यांच्या नावाची चर्चा आहे. हे तीनही संभाव्य उमेदवार केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या गोटातील असल्याने हे पाहणे सर्वांच्या उत्सुकतेचा विषय आहे. काँग्रेसकडून राजुरा काँग्रेस कमेटीची उमेदवारी कुणाला मिळेल, याबाबत मोठी चवीने चर्चा केली जात आहे. तालुका अध्यक्ष दादा पाटील लांडे, उमाकांत धांडे, बापू धोटे हे उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहे. या भागात उमाकांत धांडे यांचा चांगला जनसंपर्क आहे. तर दादा पाटील लांडे मुळचे गोवरीचे असल्याने त्यांचा गोतावळा मोठा आहे आणि बापू धोटे यांचे पक्षसंघटन मोठे असल्याने या तिनही उमेदवारांनी तिकीटासाठी मोर्चेबांधनी सुरु केली आहे. शिवसेनेकडून विद्यमान जि.प. सभापती सरिता कुडे या उमेदवारांसाठी पुढे आल्या आहेत. तर याच पक्षाकडून विजयालक्ष्मी रोगे व बबन उरकुडे उमेदवारीसाठी इच्छुक आहे. शेतकरी संघटनेकडून बाबा पाटील कावळे, कवडू पोटे यांच्या नावाची चर्चा उमेदवारीसाठी चांगलीच रंगत आहे. हे दोन्ही याच क्षेत्रातील मूळ रहिवासी आहे. भाजपा, सेना, संघटना व काँग्रेस पक्षाकडून ज्या संभाव्य उमेदवारांची नावे पुढे येत आहे. ते बहुतेक उमेदवार कुणबी समाजातील आहे. त्यांचे नातेवसंबंध एकमेकांशी जुळले असल्याने उमेदवारी देताना पक्षश्रेष्ठींना चांगलाच घाम फूटणार आहे. निवडणुकीच्या तोंडावर काही नवसे कार्यकर्तेही उमेदवारीसाठी पक्षाकडे चकरा मारत आहे. ही निवडणुक सर्वच पक्षांसाठी प्रतिष्ठेची मानली जात असली तरी सास्ती-गोवरी क्षेत्रातील संभाव्य उमेदवारांनी तिकीट मिळविण्यासाठी चांगलीच फिल्डींग लावली आहे. (वार्ताहर)