शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

भारनियमनाचा रबीलाही बसणार फटका

By admin | Updated: October 30, 2015 01:15 IST

निसर्गाच्या लहरीपणामुळे खरीप पिकाची नासधुस झाली. बळीराजाचे आर्थिक नुकसान झाले.

कधी सुधारणार परिस्थिती : पेरणीला होतोयं उशीरमाजरी : निसर्गाच्या लहरीपणामुळे खरीप पिकाची नासधुस झाली. बळीराजाचे आर्थिक नुकसान झाले. अवकाळी पाऊस, सुसाट वादळ- वारा आणि काही भागात सुका दुष्काळ आदी संकटामुळे खरीप पिकाच्या उत्पादनात घट आली. या संकटातून शेतकरी दादा कसाबसा सावरला. तोच आता रब्बी पिकांवरही विजेच्या भारनियमनाचे संकट ओढवले असल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे.रोजच विद्युत भारनियमनाच्या नावावर सिंगल फेस विद्युत पुरवठा होतो आणि त्याचा वेळही ठराविक नाही. अचानक विद्युत पुरवठ्यात कमी-जास्त दाब होत असल्याने शेतकऱ्यांच्या कृषीपंपात बिघाड होत आहे. काही शेतकऱ्यांच्या कृषीपंपाच्या मोटारी जळल्यात. यामुळे पाणी असून शेतात ओलीत करु शकत नाही आणि रबी पिकांच्या पेरणीला विलंब होत असल्याच्या तक्रारी आहे. पूर्वीच जंगली डुक्कर व रोही यामुळे शेतीचे नुकसान झाले. यापुढेही वन्यप्राण्यांमुळे पिकांचे नुकसान होणार यात शंका नाही. अशातच विद्युत पुरवठ्यामध्ये गैरसोय झाल्यास रबीची पेरणी करायची की नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.राज्य सरकारच्या विद्युत कंपनीला महावितरण असे संबोधले जाते. मात्र प्रत्यक्षात वीज वितरणाची सोय पाहता महावितरण न म्हणता महामरण असेच म्हणण्याची पाळी आली आहे. या शब्दात बळीराजा रोष व्यक्त करीत आहे.सद्यस्थितीत सर्वच जलाशयात काही प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध आहे. वीज निर्मितीसाठी लागणारा दगडी कोळसाही पुरवठा होत आहे. आणि वीज निर्मीती करणारे अधिकारी - कर्मचारी रोज सेवा देत आहे. एवढी सारी जमेची बाजू असताना विद्युत पुरवठ्याची गैरसोय ग्रामीण नागरिक व बळीराजावर का ओढवली जाते, असा प्रश्न या निमित्ताने ग्रामीण शेतकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. या अथवा कोणत्याही कारणाने शेतीचे नुकसान झाल्यावर आणि सर्वत्र आंदोलने छेडल्यानंतर मदतीचे पाने शेतकऱ्यांच्या तोंडाला पुसली जातात. निवडणुकीच्या वेळी बळीराजाला पुढारी- नेत्यांकडून समस्या सोडविण्याचा लालीपॉप दाखविला जातो. मात्र ऐन संकटकाळी साऱ्यांकडूनच पाठ फिरविली जात असल्याचा शेतकरी व ग्रामस्थ यांचा आरोप आहे.शेतकऱ्यांना खरी गरज असेल ती सिंचन व्यवस्था, २४ तास योग्य दाब असलेला वीज पुरवठा, स्वस्त दरात बि-बियाणे, खत, कृषी साहित्य, शेतीमालाला योग्य भाव आणि संकटकाळी सरकारी मदत याची. ही मदत शासकीय यंत्रणांनी पुरवावी, अशी बळीराजाची अपेक्षा आहे. असे झाल्यास शेतकऱ्यांचे दिवस सुधारणार आहे, अन्यथा त्यांची चिंता कायमच राहणार आहे. (वार्ताहर)