शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
4
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
5
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
6
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
7
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
8
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
9
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
10
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
11
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
12
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
13
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
14
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
15
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
16
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
17
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
18
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
19
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
20
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
Daily Top 2Weekly Top 5

वृक्ष लागवड करण्यास कन्हारगाववासीयांचा बहिष्कार

By admin | Updated: July 3, 2017 01:00 IST

संपूर्ण महाराष्ट्रात चार कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले असून ठिकठिकाणी वृक्ष लागवड केली जात आहे.

वनविकास महामंडळातील प्रकार : अधिकाऱ्यांचे दडपशाहीचे धोरणलोकमत न्यूज नेटवर्ककोठारी : संपूर्ण महाराष्ट्रात चार कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले असून ठिकठिकाणी वृक्ष लागवड केली जात आहे. यासाठी वनविभागासह इतर विभागानी पुढाकार घेतला आहे. या महोत्सवात संपूर्ण जिल्हा सहाभागी झाला असून लोकसहभाग मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. मात्र या वृक्ष लागवडीला कन्हारगाववासी अपवाद आहेत.मध्य चांदा वनविकास महामंडळ विभाग बल्लारशाह अंतर्गत कन्हारगाव वनपरिक्षेत्रात आज घडीला एकही झाडाचे रोपवन झाले नाही. वनविकास महामंडळातील वरिष्ठ अधिकारी यासाठी कुठलीही तयारी केली नाही. या महोत्सवात लोकसहभागासाठी गावकऱ्यांशी कधीही चर्चा केली नाही. त्याबाबत पुसटशी कल्पना दिली नाही. महामंडळातील अधिकारी मागील वर्षभरापासून जंगलात काम करणाऱ्या मजुरांशी व कर्मचाऱ्यांशी दडपशाहीचे तंत्र वापरत आहेत. त्यामुळे गावकरी त्रस्त आहेत.या वनक्षेत्रात कामाची जबाबदारी असणाऱ्या वनकर्मचाऱ्यांकडून वरिष्ठ अधिकारी दबावाने अल्पशा मजुरीत मजुरांकडून कामे करवून घेतात. तसे न केल्यास कामावरुन बंद काढण्याच्या धमक्या देतात. स्थानिकांनी आम्ही दिलेल्या मजुरीत काम न केल्यास परप्रांतीय मजुरांकडून कामे करवून घेवू, असे सांगितले जाते. कामावर आलेल्या मजुरांना कुठलीही सुरक्षा दिली जात नाही. त्यांच्या आरोग्याची काळजी घेतल्या जात नाही. शुद्ध पिण्याचे पाणीही पुरविल्या जात नाही. परिणामी मजुरांवर विपरीत परिणाम होतो. एकप्रकारे वरिष्ठ अधिकारी मजुरांचे, गावकऱ्यांचे विविध प्रकारे शोषण करीत असतात. त्यामुळेच कन्हारगावातील व परिसरातील जनतेनी वृक्ष लागवडीच्या महोत्सवात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला. संपूर्ण सप्ताहात एकही झाड न लावण्याचा निर्धार गावकऱ्यांनी केला आहे. त्याची सुरुवात १ जुलैला झाली. या दिवशी एकही झाडाची लागवड या गावात करण्यात आली नाही. वनविकास महामंडळाच्या नाकर्तेपणामुळे ना. मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून साकारलेले चार कोटी वृक्ष लागवड करण्याच्या वनमहोत्सवाला जनतेत जागृती न करुन व जनतेचा सहभाग घेण्यासाठी कुठलीही तयारी न केल्याने हरताळ फासले आहे.