शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
4
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
5
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
6
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
7
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
8
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
9
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
10
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
11
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
12
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
13
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
14
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
15
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
16
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
17
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
18
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
19
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

व्याहाड आरोग्य केंद्रात रक्तदान शिबिर

By admin | Updated: December 19, 2015 00:48 IST

सावली तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व्याहाड (बुज.) येथे स्व. गणपतराव पाटील बहुउद्देशीय सामाजिक संस्था व्याहाड (बुज.) च्या वतीने ...

उपरी : सावली तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व्याहाड (बुज.) येथे स्व. गणपतराव पाटील बहुउद्देशीय सामाजिक संस्था व्याहाड (बुज.) च्या वतीने संस्थाध्यक्ष सुनिल बोमनवार यांनी रक्तदान शिबिर व रुग्णांना फळे वाटपचा कार्यक्रम आयोजित केला होता.या शिबिराचे उद्घाटन सरपंच शिला बाबुरावपाटील म्हशाखेत्री यांच्या हस्ते झाले. यावेळी कृ.उ.बा. समितीचे माजी संचालक नरेंद्र तांगडे, उपसरपंच योगेश बोमनवार, तुळशिदास बुरडे, डॉ. मारोती मोटघरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. मडावी, हिवरू गदेवार, अनिल मशाखेत्री, अनिल देवतळे, हृषीकेश नगारे, रघुनाथ मशाखेत्री, मारोती गुरनुले, देवदत बांबोळे आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.यावेळी पाहुण्यांनी स्व. गणपतराव पाटील बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुनील बोमनवार यांनी मागील चार वर्षापासून प्रा.आ. केंद्र व्याहाड (बुज) येथे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या पुढकारातून रक्तदान शिबिर व रुग्णांना फळे वाटपाचा कार्यक्रम घेतला जात आहे. ही आनंदाची गोष्ट आहे. अशा शिबिरामुळे रक्तपेढीत रक्ताचा साठा होण्यास मोठे सहकार्य होत आहे. नागरिकांनी अशा शिबिरात आपले योगदान देण्यासाठी पुढे यावे असे मत व्यक्त केले.सदर शिबिरामध्ये जवळपास २० रक्तदात्यानी रक्तदान केले. हे रक्त जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथील रक्तपेढीत जमा करण्यात आले. रक्त संकलनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयातील चमूने कार्य केले. त्याचप्रमाणे रुग्णांना पाहुण्यांच्या हस्ते फळे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन हृषीकेश नगारे यांनी केले. प्रास्ताविक सुनील बोमनवार यांनी तर आभार संदीप देवघडे यांनी मानले. (वार्ताहर)