शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

जि.प.मध्ये सर्वसामान्यांची नाकेबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 05:00 IST

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे दररोज शेकडो अभ्यागत विविध कामे घेऊन येतात. दरम्यान, समाजातील सर्व घटकातील नागरिकांनी आरोग्य सेतू अ‍ॅप डाऊनलोड केल्यास जिल्ह्यातील कोरोना नियंत्रणासाठी त्याचा उपयोगच होणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यात तर या अ‍ॅपवरून एका बाधिताचादेखील पत्ता लागला आहे.

ठळक मुद्दे सीईओंचा अजब फतवा : आरोग्य सेतू अ‍ॅप डाऊनलोड करण्याची सक्ती

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : गेल्या चार महिन्यांपासून कोरोना आजारापासून सामान्य जनतेला दूर ठेवण्यासाठी झटत असणारे जिल्हा परिषद चंद्रपूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी आता त्यांना भेटायला येणाऱ्या अभ्यागतांसाठी एक अजबच गळ घातली आहे. मला भेटायचे असेल तर आधी आपल्या फोनवर आरोग्य सेतू अ‍ॅप डाऊनलोड करा, असा फतवाच त्यांनी काढला आहे. त्यामुळे मोबाईलमध्ये सदर अ‍ॅप नसणाऱ्यांसाठी जिल्हा परिषदेत आता नाकेबंदीच झाली आहे.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे दररोज शेकडो अभ्यागत विविध कामे घेऊन येतात. दरम्यान, समाजातील सर्व घटकातील नागरिकांनी आरोग्य सेतू अ‍ॅप डाऊनलोड केल्यास जिल्ह्यातील कोरोना नियंत्रणासाठी त्याचा उपयोगच होणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यात तर या अ‍ॅपवरून एका बाधिताचादेखील पत्ता लागला आहे. त्यामुळे हे अ‍ॅप अ‍ॅन्ड्राईड मोबाईल फोन असणाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांची भेट घेताना त्यांच्याकडे आरोग्य सेतू अ‍ॅप डाऊनलोड केला आहे का, हे आता तपासले जाणार आहे. सामान्य नागरिक, कर्मचारी गावातील, क्षेत्रातील अडचणींचे निराकरण करण्याकरिता मुख्य कार्यकारी अधिकारी यांची प्रत्यक्ष भेटी घेतात. कोविड-१९ मुळे खबरदारी म्हणून मास्क वापरणे कार्यालयात बंधनकारक केले आहे. तसेच सॅनिटायझर, वॉश बेसिन इत्यादींची व्यवस्था केलेली आहे. इथपर्यंत सर्व ठिक आहे. मात्र आरोग्य सेतू अ‍ॅप डाऊनलोड करणे गरजेचे असले तरी ती बाब ऐच्छिक आहे. मात्र सीईओंनी तर याची सक्तीच केली आहे. एखाद्याला ते अ‍ॅप डाऊनलोड करायचे नसेल तर त्याच्या अडचणीचे आता जिल्हा परिषदेकडून निराकरण होणार नाही का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. स्पार्ट फोनधारकांनी आरोग्य सेतूचा वापर जास्त प्रमाणात करावा, यासाठी जिल्हा प्रशासनाद्वारे आवाहन करण्यात येत आहे. तरीसुद्धा अनेक नागरिक आरोग्य सेतूचा वापर कमी प्रमाणात करताना दिसत आहे. त्यामुळे सीईओंनी असा आदेश काढला.इतर अधिकाऱ्यांनाही तशाच सूचनामुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी जिल्ह्यातील कोरोना नियंत्रणासाठी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी गठित केलेल्या नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून जिल्ह्यातील गावांना जिल्हाधिकारी कार्यालयाशी जोडण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांनी केवळ स्वत:साठीच ही गळ घातली नसून जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांना भेटायला येणाऱ्या अभ्यागतांना आरोग्य सेतू अ‍ॅप डाऊनलोड करण्यासाठी प्रेरित करावे, अशा सूचनादेखील कर्डिले यांनी आपल्या अधिनस्त असणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. जिल्हा परिषद चंद्रपूरचे अधिनस्त सर्व विभाग प्रमुख व गटविकास अधिकारी तसेच इतर कार्यालय प्रमुख यांचीसुद्धा भेट घेताना स्मार्टफोन धारकांनी आरोग्य सेतू अ‍ॅप डाऊनलोड करणे आता आवश्यक आहे. याविषयीची माहिती एका प्रसिद्धीपत्रकात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांच्या कार्यालयाने जारी केली आहे.मला कार्यालयात भेटणाऱ्या अभ्यागतांसाठी आरोग्य सेतू अ‍ॅप डॉऊनलोड करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी नागरिकांनी खबरदारी घ्यावी, एवढाच यामागे हेतू आहे.-राहुल कर्डिले,सीईओ, जि.प. चंद्रपूर.

टॅग्स :zpजिल्हा परिषद