शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
4
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
5
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
6
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
7
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
8
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
9
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
10
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
11
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
12
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
13
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
14
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
15
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
16
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
17
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
18
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
19
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
20
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय महाविद्यालय रोखण्यामागे भाजपाचेच संगनमत

By admin | Updated: June 21, 2015 01:48 IST

राज्यातील सहा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांसह चंद्रपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रोखण्यामागे भाजपाचेच संगणमत आहे.

चंद्रपूर : राज्यातील सहा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांसह चंद्रपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रोखण्यामागे भाजपाचेच संगणमत आहे. ज्या जनतेने विश्वासाने सत्ता सोपविली त्या जनतेशी झालेला हा प्रचंड विश्वासघात आहे, अशी बोचरी टीका काँग्रेसचे नेते माजी खासदार नरेश पुगलिया यांनी शनिवारी एका पत्रकार परिषदेत केली.चंद्रपुरातील वैद्यकीय महाविद्यालयांसह राज्यातील सहा वैद्यकीय महाविद्यालयांची मान्यता रोखल्याच्या निषेधार्थ एनएसयूआयने शनिवारी एक दिवसाचा धरणा स्थानिक गांधी चौकात दिला. त्या वेळी झालेल्या पत्रकार परिषदेत पुगलिया यांनी ही टीका केली.पुगलिया म्हणाले, प्रत्यक्षात या सर्व महाविद्यालयांच्या स्थापनेचा मार्ग मोकळा होता. महाविद्यालये सुरु करण्याची पूर्ण तयारीही झाली होती. राज्यातील ६०० विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सुविधेसोबतच राज्यातील हजारो जनतेला मिळणाऱ्या वैद्यकीय सुविधेचाही हा मानविय विषय होता. मात्र भाजपाच्या नेत्यांनी यात राजकारण आणले. त्यातूनच ही सर्व महाविद्यालये रद्द झाली आहेत. केवळ महाराष्टातीलच नाही तर देशातील ६६ महाविद्यालयांची परवानगी रद्द झाली, असे भाजपाची मंडळी आपल्या खुलाश्यात सांगत आहेत. हे वक्तव्य ही मंडळी कितपत गंभीरपणे करीत असतील, याचा विचार जनता करणारच आहे. या संदर्भात आपण मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहून विनंती केल्याचे सांगून पुगलिया म्हणाले, त्यांना आपण हस्तक्षेपाची विनंती केली आहे. मात्र ते किती प्रतिसाद देतील, याबद्दल शंकाच आहे.हा लढा जनतेच्या हक्काचा आणि आरोग्यचा आहे. त्यामुळे लोकशाही मार्गाने आणि न्यायालयीन लढ्याने आपण तो लढू. या संदर्भात गडचिरोलीतील मंडळी न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत. सोमवारी याच प्रश्नावर बल्लारपुरातील नागरिक आणि काँग्रेसची मंडळी एक दिवसीय धरणा देऊन आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.(जिल्हा प्रतिनिधी)