शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
5
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
6
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
7
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
8
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
9
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
10
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
11
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
12
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
13
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
14
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
15
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
16
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
17
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
18
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
19
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
Daily Top 2Weekly Top 5

भाजप, काँग्रेस एकाच माळेचे मणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:20 IST

चंद्रपूर : ओबीसीचे राजकीय आरक्षण भाजप व काँग्रेसला नको आहे. ओबीसीची जनगणना आजतागायत केली नाही. सरकारला न्यायलयात ओबीसीची संख्या ...

चंद्रपूर : ओबीसीचे राजकीय आरक्षण भाजप व काँग्रेसला नको आहे. ओबीसीची जनगणना आजतागायत केली नाही. सरकारला न्यायलयात ओबीसीची संख्या सांगता येत नाही, याला जबाबदार कालचे सत्ताधारी काँग्रेस व आजचे सत्ताधारी भाजपा आहेत. भाजपा व काँग्रेस हे एकाच माळेचे मणी आहेत, असा हल्लाबोल वंचित बहुजन आघाडीच्या राज्य अध्यक्ष रेखा ठाकूर यांनी केला.

चंद्रपूर जिल्हा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने स्थानिक एका हॉटेलमध्ये संघटन समिक्षा व संवाद यात्रा सभा मंगळवारी पार पडली. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. रेखा ठाकूर म्हणाल्या, आगामी काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायत व महानगरपालिका निवडणूक होऊ घातली आहे. या पार्श्वभूमीवर आताच आपण कामाला लागले पाहिजे. आपल्या पक्षाकडे निधीची कमतरता आहे. मात्र आपल्याकडे बाळासाहेब आंबेडकर यांचा जनाधार आहे. यासाठी संघटन महत्त्वाचे आहे. संघटनेत कृतिशील कार्यकर्ते आधार आहेत. बाळासाहेब उपाख्य प्रकाश आंबेडकर यांचा जनाधार व जिवाभावाची कार्यकर्ते पक्षाची ताकद आहे. आगामी निवडणुकीत सत्ता संपादन करून वंचितांना न्याय देण्याची भूमिका वंचित बहुजन आघाडीची आहे. यातूनच बाळासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न साकार होणार आहे, असेही रेखा ठाकूर यांनी सांगितले.

यावेळी मंचावर गोविंद दळवी, अरुंधती सिरसाट, डॉ रमेश गजभे, राजू झोडे, कुशल मेश्राम, डॉ. प्रवीण गावतुरे, राजू लोखंडे, बंडू ढेंगळे, अरविंद संदेकर, तनुजा रायपुरे, कविता गौरकार आदी पदाधिकारी उपस्थित होते. संचालन जयदीप खोब्रागडे, तर आभार कुशल मेश्राम यांनी मानले. यावेळी जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील पदाधिकारी, जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी उपस्थित होते.