शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
2
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
3
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
4
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
5
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
6
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
7
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
8
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
9
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
10
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
11
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
12
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
13
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
14
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
15
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
16
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
17
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
18
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
19
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
20
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
Daily Top 2Weekly Top 5

ब्रह्मपुरीत होणार जैवविविधता पार्क

By admin | Updated: April 9, 2016 01:36 IST

शहराच्या व तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारा जैवविविधता पार्क लवकरच ब्रह्मपुरीतील देलनवाडी ...

पर्यटन स्थळ विकास योजना : १० हेक्टर जमिनीचा होणार वापरब्रह्मपुरी : शहराच्या व तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारा जैवविविधता पार्क लवकरच ब्रह्मपुरीतील देलनवाडी मार्गावरील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाजवळ साकारण्यात येणार आहे. त्यामुळे अभ्यासकांना, पर्यटकांना, लहान मुलांना, वयोवृद्ध नागरिकांना ही पर्वणी ठरणार आहे.ब्रह्मपुरी उपवनविभाग चंद्रपूर जिल्ह्याचा पश्चिम विभाग असून १९९३ साली स्थापना करण्यात आली. हा उपवनविभाग शेकडो हेक्टरवर विस्तारलेला आहे. ब्रह्मपुरी, नागभीड, सिंदेवाही, चिमूर, वरोरा आदी तहसिलींचा यात समावेश आहे. त्यापैकी उत्तर परिक्षेत्रात ब्रह्मपुरीला गट क्र. २४२, २४३ व २५४ मध्ये शासकीय तंत्रनिकेतनजवळ गोसीखुर्द धरणाला लागून २ कोटी ५६ लाख रुपयांचा जैवविविधता पार्क येत्या काही दिवसात साकारणार आहे. या पार्कमध्ये विविध प्रकारचे बांबू, खूप कमी पाण्यात जगणाऱ्या झाडांचे प्रकार, १३० जातीचे विविध झाडे, रेन वॉटर हॉर्वेस्टींग प्रकल्प, संगीतमय कारंजे, कारंजांचे विविध प्रकार, सार्वजनिक शौचालये, पूल, चारही बाजुने पक्की संरक्षण भिंत, विद्युत रोषणाई, ई. प्रकारांनी सजणार असल्याने या परिसरात मनमोहक अशा प्रकारची अभ्यासपूर्ण पार्क साकारणाच्या प्रक्रियेला लवकरच सुरवात होणार आहे. या कामाच्या जागेची पाहणी खासदार अशोक नेते माजी आमदार प्रा.अतुल देशकर, उपवनसंरक्षक आशिष ठाकरे, सूर्यभान खोब्रागडे, डॉ. मोहन वाडेकर या समितीने नुकतीच केली आहे. या दरम्यान नगराध्यक्ष रीता उराडे, परेश शहादाणी, दीपक उराडे, क्रिष्णा सहारेल नानाजी तुपट, जगदीश तलमले व वनविभागाचे आशीर्वाद मेश्राम, पंधरे, आशा चव्हाण, गीता नन्नावरे, व संपूर्ण अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)