शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
9
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
10
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
11
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
12
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
13
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
14
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
15
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
16
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
17
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
18
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
19
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
20
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
Daily Top 2Weekly Top 5

टी-२० क्रिकेटवर कोट्यवधींचा सट्टा

By admin | Updated: March 27, 2016 00:43 IST

नुकतीच टी-२० क्रिकेट वर्ल्डकपला सुरूवात झाली आहे. क्रिकेटप्रेमीच्या उत्साहामुळे सट्टेबाज व बुकी मोठ्या प्रमाणात सक्रीय झाले

पोलीस विभाग अनभिज्ञ : प्रत्येक सामन्यात सक्रिय असतात बुकीपरिमल डोहणे चंद्रपूरनुकतीच टी-२० क्रिकेट वर्ल्डकपला सुरूवात झाली आहे. क्रिकेटप्रेमीच्या उत्साहामुळे सट्टेबाज व बुकी मोठ्या प्रमाणात सक्रीय झाले आहेत. त्यामुळे या सट्टेबाजाच्या व बुकीच्या साहाय्याने संपुर्ण जिल्हाभरात दररोज या क्रिकेट मॅचवर कोट्यवधीचा सट्टा लावला जात आहे. परंतु पोलीस विभाग या बाबीशी अनभिज्ञ असल्याचे दिसून येत आहे.८ मार्चपासून टी-२० वर्ल्डकपचे सहावे पर्व सुरू झाले आहे. त्यात भारतासह अनेक देश सहभागी झाले आहेत. पूर्वी क्रिकेट हा खेळ मनोरंजन करण्यासाठी बघितल्या जात होता. परंतु आता अनेक सट्टेबाज तसेच बुकींनी या खेळात शिरकाव करून आपल्या एजंटच्या साहाय्याने क्रिकेटप्रेमींना वेगवेगळी आमिष दाखवून त्यांना सट्टाबाजीच्या नांदात गुंतविले आहे. त्यामुळे प्रत्येक क्रिकेटच्या सामन्यावर मोठ्या प्रमाणात सट्टा लागताना दिसून येत आहे.क्रिकेट सुरू होण्याच्या काही वेळ आधीपासूनच या सट्टेबाजांकडून प्रत्येक संघाचे तसेच खेळाडूंचे भाव ठरवले जातात. या बुकीनी तसेच सट्टेबाजांनी चंद्रपूरसह संपुर्ण जिल्ह्यातील शहर ते गावखेड्यापर्यंत आपले एजंट ठेवले आहेत. शहरातील तसेच गावातील अनेक पानठेल्यावर किंवा निर्जन ठिकाणाचा आधार घेऊन सट्टा लावण्यात येत आहे. तसेच मोठमोठ्या रकमेचा सट्टा लावणारे बुकीच्या साहाय्याने फोनद्वारे किंवा आॅनलाईन पद्धतीने सट्टा लावत आहेत. नानेफेक जिंकण्यापासून क्रिकेटच्या पहिल्या चेंडूपासून ते शेवटच्या चेंडूपर्यंत हा सट्टा लावण्यात येत आहे. मॅच सुरू झाल्यापासून ते संपेपर्यंत सट्टेबाजांकडून क्रिकेटप्रेमीना वेगवेगळ्या दराचे प्रलोभन देण्यात येते. त्यामुळे अनेक क्रिकेटप्रेमी या प्रलोभनाला बळी पडताना दिसून येत आहे. यामध्ये बहुतांश युवक तसेच मोठमोठे व्यापारीसुद्धा बुकीकडे तसेच सट्टेबाजाकडे मोठ्या रकमेचा सट्टा लावत असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, कॉलेजमधील युवकसुद्धा क्रिकेटवर सहज शर्यत म्हणून सट्टा लावताना दिसून येत आहेत. त्यामुळे त्यांचे भविष्य अंधारात असल्याचे दिसून येत आहे.क्रिकेटमधील हा सट्टा केवळ पैशाच्या देवाणघेवाणापर्यंतच मर्यादित राहत नाही. काही वेळा या सट्टयाचे पर्यावसन भांडणात, हाणामारीतही झाले आहे. अशा घटना अनेकदा घडल्या आहेत. त्यामुळे क्रिकेटवरील सट्टयांवर पोलिसांनी लगाम लावणे गरजेचे आहे.प्रत्येक खेळांडूवर लागतोय सट्टाक्रिकेटमधील फलंदाज व गोलंदाजापासून प्रत्येक खेळाडूवर सट्टा लावण्यात येतो. त्यामध्ये प्रत्येक फलंदाजाच्या एका रणावर तर गोलंदाजाच्या प्रत्येक विवेकवर सट्टा लावण्यात येत आहे. प्रत्येक फलंदाज व गोलंदाजाचे दर बुकीनी वेगवेगळे ठरवले असतात.शाळकरी मुलांनाही नादमोठ्याचे अनुकरण करत शाळकरी मुलेसुद्धा सट्टाबाजीत गुंतल्याचे दिसून येते. पाच ते दहा रुपयांपासून त्यांचा हा सट्टा सुरू होतो. जिंकल्यावर सट्टयाची रक्कमही वाढत जाते. पालकांनी याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.क्रिकेटवर लावण्यात येणारा सट्टा हा आॅनलाईन पद्धतीने लावण्यात येत आहेत. त्यामुळे सट्टेबाजाचे सेंटर शोधून सट्टेबाजांना पकडण्याचे वर्क आऊट सुरू करण्यात आले आहे.- संदीप दिवाण, जिल्हा पोलीस अधीक्षक, चंद्रपूर