शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

भद्रावतीत उपजिल्हा रुग्णालयाचे संकेत

By admin | Updated: May 31, 2015 01:58 IST

ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी म्हणून शासनाच्या वतीने आरोग्य सेवा गावागावात पोहचविण्यात येते.

भद्रावती : ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी म्हणून शासनाच्या वतीने आरोग्य सेवा गावागावात पोहचविण्यात येते. परंतु भद्रावती येथील कार्यरत ग्रामीण रुग्णालय रिक्त पदे, अपुरा औषधीसाठा, आवश्यक आरोग्य विषयक तपासणी मशीन यंत्रणा, तज्ज्ञ डॉक्टरांचा अभाव, अतीआजारी रुग्णांकरिता वेळेवर अ‍ॅम्बुलन्सची व्यवस्था न होणे आदी समस्येने ग्रासलेले आहे. त्यामुळे भद्रावतीच्या ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रुपांतर करावे, अशी मागणी आ. बाळू धानोरकर यांनी केली आहे.भद्रावती तालुक्यातील लोकसंख्या १,६३,८०५ असून तालुक्यात वेगाने औद्योगीकरण होत आहे. कोळसा खाण प्रकल्प, विद्युत प्रकल्प कार्यरत आहे. परंतु पर्याप्त आरोग्य सेवा देण्यास ग्रामीण रुग्णालय असमर्थ ठरत आहे. त्यामुळे ग्रामीण परिसरातील जनतेला क्षुल्लक आजाराकरिता चंद्रपूर येथे रेफर केले जाते. या बाबीचा विचार करून वरोरा धानोरकर यांनी भद्रावती येथील ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धण करण्यात येऊन येथे उपजिल्हा रुग्णालय स्थापन करण्यात यावे म्हणून आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांना ३ फेब्रुवारीला प्रत्यक्ष भेटीत चर्चा करून निवेदन सादर केले. या अनुषंगाने अधिक्षक ग्रामीण रुग्णालय भद्रावती यांनी त्यांचे कार्यालयीन पत्र ८ मे रोजी जिल्हा शल्य चिकित्सक चंद्रपूर यांच्यामार्फत उपसंचालक आरोग्य सेवा मंडळ नागपूर यांना विस्तृत अहवाल सादर केला आहे. भद्रावती येथील ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धण करून विशेष बाब म्हणून उपजिल्हा रुग्णालय स्थापन करण्यास अनुकूलता दर्शविली आहे.धानोरकर हे भद्रावती येथे उपजिल्हा रुग्णालय स्थापन करण्याकरिता आवश्यक निधी व अन्य बाबी शासनाकडून मंजूर करून घेण्याकरिता प्रत्यशील आहेत. चालू आर्थिक वर्षात भद्रावती येथे उपजिल्हा रुग्णालय स्थापन करण्यात येईल, असे संकेत आरोग्य मंत्र्यांनी दिले आहे. (तालुका प्रतिनिधी)