शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

भद्रावतीत रास्तारोको आंदोलन

By admin | Updated: November 1, 2016 00:54 IST

मोबाईलवरील व्हाट्स अ‍ॅप ग्रुपवर काही समाजकंटकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत आक्षेपार्ह मजकूर असलेली पोस्ट टाकण्यात आली.

आरोपीला अटक करा : व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपवर आक्षेपार्ह मजकूरभद्रावती : मोबाईलवरील व्हाट्स अ‍ॅप ग्रुपवर काही समाजकंटकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत आक्षेपार्ह मजकूर असलेली पोस्ट टाकण्यात आली. ही पोस्ट येथील राजू दारुंडे यांच्या मोबाईलवर येताच त्यांनी याबाबत समाजबांधवांना कळविले. ही पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घ्यावे, या मागणीसाठी भद्रावती येथील पेट्रोल पंप चौकात नागपूर- चंद्रपूर महामार्गावर तब्बल अर्धा तास रास्तारोको आंदोलन करण्यात आले. व्हॉट्स ग्रुपवरील या पोस्टची पसरताच येथील समाज कार्यकर्ते विशाल बोरकर यांनी बोद्ध समाजबांधवांची बैठक बोलावून पोलीस स्टेशन भद्रावती येथे हरहर महादेव या ग्रुपचे अ‍ॅडमीन व ज्यांनी ही पोस्ट टाकली, त्या व्यक्तीला त्वरीत अटक करण्याची मागणी केली. या घटनेचा निषेध म्हणून मुख्य महामार्गावर तब्बल अर्धा तास रास्ता रोको करुन नारेबाजी करण्यात आली. चंद्रपूर-नागपूर या मार्गावर २४ तास वाहतूक सुरू राहते. या आंदोलनामुळे या मार्गावर वाहनांची रांग लागली होती.या आंदोलनात विशाल बोरकर, विजय मेश्राम, प्रज्वल पेटकर, राजेश नागदेवते, डी. एस. रामटेके, सतिश मस्के, अजय देवगळे, संजय देवगळे, संदीप जिवने यासह असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते. ठाणेदार आशिष गजभीये यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक किशोर मित्तलवार यांच्या पथकाला अमरावती येथे रवाना केले व अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. मुख्य आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत. (शहर प्रतिनिधी) मुख्य आरोपीला अटक कराडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत मोबाईल व्हाट्स अ‍ॅप ग्रुपवर आक्षेपार्ह मजकूर टाकल्याने आमच्या बोद्ध बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणातील मुख्य आरोपीला ताब्यात घ्यावे, या मागणीकरिता आम्ही रास्ता रोको करुन पोलिसांचे लक्ष वेधले आहे. आरोपीला अटक झाली नाही तर तिव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा समाज कार्यकर्ते विशाल बोरकर यांनी सोमवारी सायंकाळी आयोजित पत्रकार परिषदेत दिला. बोद्ध बांधवांनी घटनेचा निषेध नोंदवून आरोपीला अटक करण्याची मागणी केली. त्यानंतर रास्तारोको करुन पोलिसांची कोणतीही चूक नसताना त्यांनी पोलिसांच्या विरोधात नारेबाजी केली. या प्रकरणी यातील १० ते १२ कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.-आशिष गजभिये, ठाणेदार, भद्रावती