शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
2
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
3
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
4
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
5
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
6
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
7
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
8
Mumbra Shocking: ‘ॲक्शन रील’चा भयंकर शेवट, आठ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?
9
"कोणाच्या खिशात आहेत माझे पैसे?"; बोनस मिळाल्याच्या चर्चांवर राकेश बेदींचा मजेशीर व्हिडीओ
10
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
11
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
12
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
13
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
14
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
15
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
16
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
17
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
18
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
19
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
20
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
Daily Top 2Weekly Top 5

44,375 मातांना प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 05:00 IST

दारिद्रय रेषेखालील व या रेषेवरील गर्भवती महिलांना अनुदान देण्यासाठी १ जानेवारी २०१७ पासून प्रधानमंत्री मातृ वंदना योजना सुरू झाली. ही योजना वेतनासह मातृत्व रजा घेणाऱ्या महिलांना लागू नाही. योजनेचा लाभ घेण्यासाठी पती व पत्नीचे आधारकार्ड, बँक खाते, माता व बाल संरक्षणकार्ड आदी कागदपत्रांची आवश्यकता आहे. जिल्ह्यात ही योजना ९७.९७ पूर्ण करण्याचे उद्दिष्टे पूढे ठेवण्यात आले.

ठळक मुद्दे१५६० प्रकरणात त्रुटी : गतवर्षी जिल्ह्याला मिळाला पुरस्कार

  लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : प्रधानमंत्री  मातृ वंदना योजनेचा लाभ घेण्यास पात्र ठरलेल्या जिल्ह्यातील ४५ हजार २९५ महिलांची नोंदणी करण्यात आली.  मासिक पाळी चुकल्यानंतर १०० दिवसांच्या आत ए. एन.एमकडे नोंदणी झालेल्या ४४ हजार ३७५ महिलांना मदतीचा पहिला लाभ मिळाला. दुसरा व तिसरा लाभ घेण्यास  त्या पात्र आहेत. मात्र, कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळूनही पुर्तता न केल्याने १ हजार ५६० महिलांना अद्याप अनुदाचा लाभ मिळू शकला नाही. दारिद्रय रेषेखालील व या रेषेवरील गर्भवती महिलांना अनुदान देण्यासाठी १ जानेवारी २०१७ पासून प्रधानमंत्री मातृ वंदना योजना सुरू झाली. ही योजना वेतनासह मातृत्व रजा घेणाऱ्या महिलांना लागू नाही. योजनेचा लाभ घेण्यासाठी पती व पत्नीचे आधारकार्ड, बँक खाते, माता व बाल संरक्षणकार्ड आदी कागदपत्रांची आवश्यकता आहे. जिल्ह्यात ही योजना ९७.९७ पूर्ण करण्याचे उद्दिष्टे पूढे ठेवण्यात आले.

काय दिली जाते मदत?मासिक पाळी चुकल्यानंतर शंभर दिवसांच्या आत नोंदणी केल्यास पहिला लाभ १ हजार रूपये, शासकीय व खासगी आरोग्य संस्थेत प्रसुतीपूर्व किमान एकदा आरोग्य चाचणी केल्यास दुसरा लाभ २ हजार रूपये तसेच शासकीय व खासगी आरोग्य संस्थेत बाळाचे साडेतीन महिन्यापर्यंतचे लसीकरण पूर्ण केल्यास तिसरा लाभ २ हजार रूपये असे एकूण ५ हजार रूपये दिले जाते.

प्रधानमंत्री मातृवंदना योजनेची प्रभावीरित्या अंमलबजावणी केली जात आहे.  सर्व तालुके तसेच नगर परिषदांमध्ये योजनेद्वारे मदत दिले जाते. जी प्रकरणे कागदपदत्रांअभावी प्रलंबित आहेत त्यांचा निपटारा करण्याच्या सूचना देण्यात आल्या. नोंदणी केलेली एकही महिला लाभापासून वंचित राहणार नाही. गर्भवती महिला व स्तनदामातेला सकस आहाराकडे विशेष लक्ष आहे.- डाॅ. राजकुमार गहलोत, जिल्हा आरोग्य अधिकारी, चंद्रपूर

 

टॅग्स :government schemeसरकारी योजना