शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
3
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
4
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
5
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
6
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
7
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
8
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
9
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
10
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
11
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
12
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
13
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
14
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
15
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
16
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
17
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
18
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
19
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
20
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
Daily Top 2Weekly Top 5

लाभार्थ्यांना गॅस कनेक्शन वाटपात दिरंगाई

By admin | Updated: April 3, 2016 03:50 IST

वनविभाग व वन व्यवस्थापन समितीमार्फत गॅस कनेक्शन मिळण्याकरिता लाभार्थ्यांनी रकमेचा भरणा केलेला आहे.

वनाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष : अनुसूचित जाती लाभार्थ्यांमध्ये तीव्र असंतोषघोसरी : वनविभाग व वन व्यवस्थापन समितीमार्फत गॅस कनेक्शन मिळण्याकरिता लाभार्थ्यांनी रकमेचा भरणा केलेला आहे. ८-९ महिन्याचा विलंबानंतरही लाभांकित केले नसल्याने स्थानिक अनुसूचित जाती प्रवर्गातील लाभार्थ्यांमध्ये असंतोष व्यक्त केला जात आहे.पोंभूर्णा तालुक्यातील घोसरी वनक्षेत्रातील अनुसूचित जाती प्रवर्गातील २५ लाभार्थ्यांनी २ हजार ५५० रु. वन व्यवस्थापन समिती सचिव तथा वनपाल माणिक गोंगले यांच्याकडे भरले. त्यामुळे शासकीय अनुदान वरिष्ठ स्तरावरुन प्राप्तदेखील झालेले असल्याचे कळते. तरीदेखील लाभार्थ्यांना गॅस वाटप करण्यास दिरंगार्ई केली जात असल्याने सरपणाचा प्रश्न आवासून उभा ठाकला आहे.इतर प्रवर्गातील लाभार्थ्यांना दिवाळीमध्येच गॅस कनेक्शन दिलेला आहे. तद्नंतर वनपाल गोंगले यांची कोठारी येथे बदली होवून रुजू झाल्यानंतर दोन महिन्यापासून आर्थिक प्रभार संबंधितांकडे दिलेला नसल्याने गॅस वितरणाचे वाटप अडगळीत पडलेले आहे. वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी लाभार्थ्यांची होत असलेली गळचेपी बघून यथाशिघ्र कार्यवाही करावी. अन्यथा वनपरिक्षेत्र कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा नवनियुक्त वन व्यवस्थापन समिती पदाधिकाऱ्यांनी दिलेला आहे. (वार्ताहर)