शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: ५ राज्यांमध्ये 'सत्ता'धीश कोण?, आज होणार फैसला; पश्चिम बंगालकडे सगळ्यांचे लक्ष
2
बंगालमध्ये तृणमूल-भाजपामध्ये अटीतटीची लढत, सुरुवातीच्या कलांमध्ये कुणाला आघाडी? अशी आहे आकडेवारी
3
Tamil Nadu Elections 2026: विजय थलपती ते खुशबू सुंदर... पडद्यावरच्या कलाकारांची प्रतिष्ठा पणाला, कोण मारणार बाजी?
4
भाजपासाठी पश्चिम बंगाल ठरणार 'लास्ट फ्रंटियर'; जय-पराजयाचा परिणाम 'मिशन UP' वर पडणार?
5
Post Office ची कमाई करुन देणारी स्कीम, जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
6
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
7
'राजा शिवाजी'चं वीकेंड कलेक्शन किती? समोर आले आकडे; मराठी प्रेक्षकांची मान उंचावली
8
पश्चिम बंगालमधील या दोन मतदारसंघात 'कांटे की टक्कर', निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष
9
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
10
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
11
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
12
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
13
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
14
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
15
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
16
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
17
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
18
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
19
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
20
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
Daily Top 2Weekly Top 5

पोटच्या गोळ्यांनी नाकारलेल्यांच्या हाती आले भिक्षापात्र

By admin | Updated: February 2, 2015 23:02 IST

ज्यांना बोट धरून चालायला शिकविलं, मोठ्या प्रेमाने ज्यांचं संगोपन करून मोठही केलं. त्याच पोटच्या गोळ्यांनी आयुष्याच्या सायंकाळी आपल्या जन्मदात्यांना घराबाहेर काढून दिलं.

जन्मदात्यांनाच काढले घराबाहेर : प्रत्येकाचीच कहाणी मन हेलावून टाकणारीरुपेश कोकावार - बाबुपेठ (चंद्रपूर)ज्यांना बोट धरून चालायला शिकविलं, मोठ्या प्रेमाने ज्यांचं संगोपन करून मोठही केलं. त्याच पोटच्या गोळ्यांनी आयुष्याच्या सायंकाळी आपल्या जन्मदात्यांना घराबाहेर काढून दिलं. हक्काचं घरटं हरवून बसलले असहाय्य आई-वडील रस्त्यावर आलेत. आता ते चंद्रपूरच्या महाकाली मंदिर परिसरात ४० पेक्षा अधिक वृद्ध महिला-पुरूष भिक्षा मागून आपले पोट भरताहेत. रक्ताच्या नात्याने झिडकारल्यामुळे भिक्षेचे पात्र हाती घेऊन जगणाऱ्या येथील प्रत्येकाचीच कहाणी हृदय पिळवटून टाकणारी आहे. दोन महिन्यांपूर्वी येथील भिक्षुकांच्या डेऱ्यात दाखल झालेल्या देवकीच्या (बदललेले नाव) नशिबीही याच यातना आल्यात. ती मूळची नांदेड येथील रहिवासी आहे. तिच्याकडे १५ एकर शेती असून तिला एकुलता एक मुलगा आहे. पाच वर्षांपूर्वी पतीचे निधन झाले. ती मुलगा व सुनेसोबत राहू लागली. मात्र पुढे देवकीचे सुनेशी पटेनासे झाले. लहान-लहान बाबींवरून खटके उडायला लागले. त्यानंतर वाद विकोपाला जाऊन एक दिवस मुलाने देवकीलाच तिच्या हक्काच्या घरातून बाहेर काढले. त्यामुळे निराधार झाल्याने ती थेट चंद्रपुरातील महाकाली मंदिर परिसरात दाखल झाली. आता ती भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह भागवित आहे. दोन मुलांपैकी एक मुलगा वेकोलित मोठ्या पदावर तर नात पोलीस खात्यात असलेल्या ६० वर्षीय प्रमिला (बदलेले नाव) वरही असाच प्रसंग ओढवला आहे. घरात उद्भवलेल्या किरकोळ वादात मुलाने तिला घराबाहेर हुसकावून लावले. त्यामुळे भिक्षा मागण्याशिवाय तिच्यापुढे पर्याय नव्हता. म्हणूनच तिने महाकाली मंदिर जवळ केले. गेल्या एक दिड वर्षापासून ती या परिसरात जीवन जगत आहे.