सावधान ! अजूनही संपला नाही कोरोना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:37 IST2021-06-16T04:37:37+5:302021-06-16T04:37:37+5:30

जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या ८४ हजार २४३ वर पोहोचली आहे. आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या ८१ हजार ८६० झाली आहे. ...

Be careful! Still not finished Corona | सावधान ! अजूनही संपला नाही कोरोना

सावधान ! अजूनही संपला नाही कोरोना

जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या ८४ हजार २४३ वर पोहोचली आहे. आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या ८१ हजार ८६० झाली आहे. सध्या ८८१ बाधितांवर उपचार सुरू आहेत. ५ लाख १८ हजार ६४७ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ४ लाख ३१ हजार ८२७ नमुने निगेटिव्ह आले आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत १५०२ बाधितांचे मृत्यू झाले. यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील १३८९, तेलंगणा दोन, बुलडाणा एक, गडचिरोली ४१, यवतमाळ ५२, भंडारा ११, वर्धा एक, गोंदिया तीन आणि नागपूर येथील दोन बाधितांचा समावेश आहे.

नागरिकांनी कोरोना संपला या मानसिकतेतून बाहेर यावे. त्रिसूत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी आणि कोरोनाची लस घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

पाच तालुक्यात एकही रुग्ण नाही

बाधित आढळलेल्या ३१ रुग्णांमध्ये चंद्रपूर मनपा क्षेत्रातील ७, चंद्रपूर तालुका ३, बल्लारपूर ४, ब्रह्मपुरी १, नागभीड ३, मूल १, गोंडपिपरी २, राजुरा २, वरोरा २, कोरपना १, जिवती ३ व इतर ठिकाणच्या २ रुग्णांचा समावेश आहे. भद्रावती, सावली, पोंभूर्णा, सिंदेवाही व चिमूर तालुक्यात आज एकही रुग्ण आढळला नाही.

असे आहेत मृत

आज मृत झालेल्यांमध्ये चंद्रपुरातील क्रिष्णानगर येथील ६१ वर्षीय पुरुष, सिव्हिल लाईन परिसरातील ९५ वर्षीय महिला, विठ्ठल मंदिर वाॅर्ड परिसरातील ७० वर्षीय महिला, ब्रह्मपुरी तालुक्यातील हळदा येथील ५५ वर्षीय महिला, गोंडपिपरी तालुक्यातील ७६ वर्षीय पुरुष तर गडचिरोली जिल्ह्यातील ३१ वर्षीय महिलेचा समावेश आहे.

Web Title: Be careful! Still not finished Corona