शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
3
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
4
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
5
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
6
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
7
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
8
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
9
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
10
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
11
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
12
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
13
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
14
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
15
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
16
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
17
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
18
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
19
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
20
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाकाळात मजुरांना तेंदूपत्ता संकलानाचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:27 IST

सास्ती : राज्यासह जिल्ह्यात कोरोनाच्या प्रादुर्भावाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. लॉकडाऊनमुळे अनेक व्यवसाय बंद पडले आहेत, तसेच ग्रामीण भागात ...

सास्ती : राज्यासह जिल्ह्यात कोरोनाच्या प्रादुर्भावाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. लॉकडाऊनमुळे अनेक व्यवसाय बंद पडले आहेत, तसेच ग्रामीण भागात शेतीची कामेसुद्धा संपल्यामुळे मजूर व शेतमजुरांना काम मिळणे बंद झाले. त्यामुळे पोटाची खळगी भरण्याचा प्रश्न उभा ठाकला आहे. अशातच तेंदूपत्ता संकलन सुरू झाल्याने ग्रामीण भागातील हातमजुरी करणाऱ्यांना या कोरोनाकाळातही आधार मिळाला आहे.

ग्रामीण भागात उन्हाळ्यात शेतीची कामे संपल्याने, तसेच कोरोनाकाळात इतर व्यवसाय आणि कामे बंद असल्यामुळे मजुरांना रोजगार मिळत नसल्याने अनेकांना पोटाची खळगी भरण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. राजुरा तालुक्यातील चुनाळा, सातरी, चनाखा, विहीरगाव, पंचाळा, कोहपरा, नलफडी, सिंधी परिसरात अनेक वर्षांपासून तेंदूपत्ता संकलनाचा व्यवसाय सुरू आहे. हा व्यवसाय २० ते ३० दिवसांचा असतो. सद्य:स्थितीत कुठलाही रोजगार नसताना मात्र ग्रामीण भागातील मजुरांना पोटाची खळगी भरण्याचा आधार तेंदूपत्ता संकलनातून निर्माण झालेला दिसून येत आहे.

बॉक्स

मागील वर्षी होती वाघाची दहशत

मागील काही वर्षांपासून या व्यवसायावर संक्रांतच येत असल्याचे दिसून येत आहे. मागील वर्षी या परिसरात वाघाच्या दहशतीमुळे तेंदूपत्ता संकलन होऊ शकले नाही. वन विभागाने त्यांच्या निगराणीत तेंदूपत्ता संकलनाचे काम केले; परंतु त्याचा लाभ अनेकांना घेता आला नाही. तेंदूपत्ता युनिटचा लिलाव वनविभागाद्वारे करण्यात येतो.

बॉक्स

असा चालतो व्यवसाय

साधारणपणे मे महिन्यात तेंदूपत्ता संकलनाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होते. भल्यापहाटेच उठून जंगलात जाऊन तेंदूपत्ता पाने तोडून आणायची. जंगलात अनेक वन्यप्राण्यांच्या दहशतीत जिवावर उदार होऊन पोटाची खळगी भरण्यासाठी हे काम करायचे. ही तेंदूपत्ताची पाने घरी आणल्यानंतर दिवसभर संपूर्ण कुटुंब मिळून ती निवडून त्यांचे पुडके बांधताना दिसतात. नंतर सायंकाळी ते फडीवर नेऊन द्यायचे. या कामात घरातील लहानग्यांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वच हे काम करताना दिसून येतात. अनेक कुटुंबे यातून बऱ्यापैकी पैसा गोळा करतात. यात शासनाकडून बोनससुद्धा दिला जातो.