शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

नुकसान भरपाईसाठी बँकेत चकरा

By admin | Updated: May 30, 2015 01:42 IST

राजुरा तालुक्यातील शेतकऱ्यांची परवड अजूनही थांबली नसून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे खात्यात शासनाकडून मिळणारी नुकसान भरपाई अद्याप जमाच झाली नसल्याने ...

१५ दिवसांत रक्कम द्या : तहसील कार्यालयापुढे ठिय्या आंदोलनाचा इशाराचंद्रपूर: राजुरा तालुक्यातील शेतकऱ्यांची परवड अजूनही थांबली नसून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे खात्यात शासनाकडून मिळणारी नुकसान भरपाई अद्याप जमाच झाली नसल्याने शेतकऱ्यांना बुरे दिन बघावयास मिळत आहेत.यावर्षी झालेला कमी पाऊस व त्यातच काही दिवसांपूर्वी झालेला अवकाळी पाऊस व अन्य नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यातील शेतीव्यवसाय व शेतकरी अडचणीत सापडला आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षाकडून वारंवार मागणी झाल्यावर राज्यातील सत्तारुढ भाजप- शिवसेना सरकारने नुकसान भरपाई जाहीर केली. मात्र राजुरा तालुक्यात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची यादी बँकेकडे पाठिवताना शेतकऱ्यांच्या नावांत प्रचंड चुका आहेत, काहींचे खाते क्रमांक बरोबर असले तरी बँकेचे नाव चुकीचे आहे. काही शेतकऱ्यांचे नावापुढे बँक खात्याचा उल्लेखच नाही तर संयुक्त नावाने असलेल्या शेतीची रक्कमही तशीच पडून आहे. या कारणांमुळे शेतकऱ्यांचे बँक खात्यात जमा न करण्यात आलेल्या रक्कमेचा डीडी तहसील कार्यालयाकडे अडीच महिन्यांपूर्वीच परत पाठविण्यात आला. मात्र अद्याप सुधारीत यादी बँकेकडे पाठविण्यात आलेली नसल्याने लवकरच सुरु होणाऱ्या शेतीचे हंगामाकरिता ही रक्कम उपयोगी येईल या आशेने पदरमोड करुन बँकेत येणाऱ्या शेतकऱ्यांना तुमची रक्कम तहसील कार्यालयातून आली नाही असे उत्तर मिळते. तर तहसील कार्यालयात आल्यानंतर या शेतकऱ्यांना बँकेत पैसे पाठविल्याचे सांगण्यात येते. यामुळे हवालदिल झालेला कास्तकार बँक ते तहसील कार्यालय अशा चकरा मारत आहे. शेतकऱ्यांची ही समस्या लक्षात घेऊन राजुरा तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष दादा पाटील लांडे यांनी राजुराचे तहसीलदार यांची भेट घेवून निवेदन दिले. तथा १५ दिवसांत हा प्रश्न निकालात न काढल्यास तहसील कार्यालयापुढे ठिय्या आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. लांडे यांचे नेतृत्वात भेटलेल्या शिष्टमंडळातत उमाकांत धांडे, अशोक देशपांडे, डॉ. उमाकांत धोटे, कर्णेवार, हेमंत झाडे, लक्ष्मणराव एकरे, रवींद्र चटके, दौलतराव घटे, सुरेश पोडे आदींचा सामवेश होता. (शहर प्रतिनिधी)