शहरं
Join us  
Trending Stories
1
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
2
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
3
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
4
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
5
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
6
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
7
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
8
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
9
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
10
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
11
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
12
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
13
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
14
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
15
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
16
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
17
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
18
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
20
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
Daily Top 2Weekly Top 5

६० वर्षांच्या आम्रवृक्षांवर कुऱ्हाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 06:00 IST

नागभीड -सिंदेवाही राज्य महामार्गावरील आम्रवृक्षांची ही गोष्ट आहे. जेव्हा हा राज्य महामार्ग झाला असेल त्यावेळी चिंधी चक ते सावरगाव दरम्यान या आम्रवृक्षांची लागवड करण्यात आली. आज हे आम्रवृक्ष मोठे झाले. या वृक्षांचा विस्तार लक्षात घेतल्यास किमान ५० ते ६० वर्षांचे नक्कीच असावे आहे. या काळात वृक्षांनी हजारो नागरिक तसेच उन्हातान्हातून प्रवास करणाऱ्या वाटसरूंना मायेची सावली आहे.

ठळक मुद्देनागरिकांमध्ये नाराजी : आठवणी काळाच्या पडद्याआड

लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : आजपर्यंत ज्यांनी कित्येकांना मायेची सावली दिली. फळांचा गोडवा दिला. त्या आम्रवृक्षांवरच कुºहाड चालविल्याने अनेकांच्या काळजात धस्स झाल्याची घटना शहरात मंगळवारी घडली. या घटनेने अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. प्रशासनाला वृक्ष वाचविता आले असते, याकडेही काहींनी लक्ष वेधले.नागभीड -सिंदेवाही राज्य महामार्गावरील आम्रवृक्षांची ही गोष्ट आहे. जेव्हा हा राज्य महामार्ग झाला असेल त्यावेळी चिंधी चक ते सावरगाव दरम्यान या आम्रवृक्षांची लागवड करण्यात आली. आज हे आम्रवृक्ष मोठे झाले. या वृक्षांचा विस्तार लक्षात घेतल्यास किमान ५० ते ६० वर्षांचे नक्कीच असावे आहे. या काळात वृक्षांनी हजारो नागरिक तसेच उन्हातान्हातून प्रवास करणाऱ्या वाटसरूंना मायेची सावली आहे. मोठे झाड आणि त्यातही आंब्याचे म्हणून अनेकांनी या झाडाखाली आपली वाहने थांबवून क्षणभर विसावा घेत होते. या वृक्षांच्या फळांचा गोडवा चाखला. तृप्तीची ढेकरही दिली आहे. पण हेच वृक्ष आज काळाला नकोशी झाली आहेत. काळाची गरज म्हणून या वृक्षांवर कुºहाड चालविण्यात आली.नागभीड - सिंदेवाही या राज्य महामार्गाच्या रूंदीकरणाचे काम सुरू करण्यात आहे.चिंधी चक ते सावरगाव दरम्यान किमान ६० ते ७० च्या संख्येत ही वृक्ष आहेत.रस्ता रूंदीकरणाची गरज म्हणून हे वृक्ष तोडणे गरजेचे आहे. या वृक्षांची तोडही सुरू करण्यात आली. ही वृक्षतोड सुरू असताना राज्य महामार्गाने प्रवास करणारे प्रवासी हळहळ व्यक्त करीत होते. एक झाड लावायला आणि ते मोठे करायला कितीतरी वर्र्षे वाट पाहावे लागते. पण, हे विशालकाय वृक्ष काही मिनिटांत नष्ट झाले. त्यामुळे अनेकांच्या मनात गहिवर दाटून आला होता.

टॅग्स :highwayमहामार्ग