शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

गडचांदूर येथील गॅस वितरकांचा मनमानी कारभार

By admin | Updated: November 4, 2014 22:37 IST

लोकसंख्येने झपाट्याने वाढलेल्या गडचांदूर शहरात सिलींडरसाठी दिवसभर प्रतीक्षेत राहावे लागत आहे. शहरात बल्लारशावरुन एचपी गॅस सिलिंंडरचा पुरवठा होत असल्याने ग्राहकांना गाडीची

कोरपना : लोकसंख्येने झपाट्याने वाढलेल्या गडचांदूर शहरात सिलींडरसाठी दिवसभर प्रतीक्षेत राहावे लागत आहे. शहरात बल्लारशावरुन एचपी गॅस सिलिंंडरचा पुरवठा होत असल्याने ग्राहकांना गाडीची वाट पाहत दिवस काढावे लागते. अशातच अधिकचे पैसे मोजूनही वितरकांकडून सुविधा मिळत नसल्याने वितरकाप्रति ग्राहकांत तिव्र असंतोष आहे.मोलमजुरी करणाऱ्या ग्राहकाला सिलींंडरसाठी मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. इंडियन कंपनीची दुसऱ्या एजन्सीत तर ग्राहकांकडून जास्तीचे पैसे घेऊनही सिलिंंडर दिले जात नाही. लखमापूर, बाखर्डी, तडोधी या गावातील काही नागरिकांचे नंबर लावूनही वेळेवर सिलिंंडर मिळत नसल्याने अनेक ग्राहकांनी गडचांदुरात सिलिंंडर गॅस एजन्सी देण्याची मागणी केली आहे. जास्तीचे पैसे देऊनही विक्रेत्यांकडून योग्य तशी सुविधा मिळत नसल्याने ग्राहक आक्रोशात आहेत. नेहमी नंबर लावला की नेहमी मोबाईल वरती येणाऱ्या मेसेजची प्रतीक्षा करावे लागते. कधी मॅसेज येतो तर कधी येत नाही. त्यामुळे ग्राहकांना तीन ते चार दिवस सारखी प्रतिक्षा करावी लागते. इंडियन आणि एचपी या दोन्ही एजन्सी सध्या कार्याबाहेर आहेत. तळोधी येथील एका ग्राहकाला मोबाईलवर एसएमएस आला. परंतु त्याच्या खात्याचे बिलच न निघाल्याने त्याला दोन दिवस तळोधी ते गडचांदूरला ये-जा करावे लागले. दोन्ही एजन्सीकडून जास्तीचे पैसे घेऊनसुद्धा सुविधा देत नसल्याने गडचांदूर येथे एजन्सी देण्याची मागणी असून मोलमजुरी करणाऱ्या ग्राहकांची लूट थांबविण्याची मागणी आहे. याची प्रशासनाने दखल घ्यावी. (तालुका प्रतिनिधी)