शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

मानोरा येथे प्राथमिक आरोग्य केंद्रास मंजुरी

By admin | Updated: March 21, 2017 00:36 IST

बल्लारपूर तालुक्यातील मानोरा येथे विशेष बाब या सदराखाली प्राथमिक आरोग्य केंद्र स्थापन करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

विशेष बाब : सुधीर मुनगंटीवार यांचा पुढाकारचंद्रपूर : बल्लारपूर तालुक्यातील मानोरा येथे विशेष बाब या सदराखाली प्राथमिक आरोग्य केंद्र स्थापन करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. राज्याचे वित्त व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या संदर्भात नागरिकांना शब्द दिला होता. या निर्णयामुळे नागरिकांत आनंद पसरले आहे.नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूकी दरम्यान मानोरा येथे झालेल्या जाहीर सभेत विशेष बाब म्हणून महिनाभरात प्राथमिक आरोग्य केंद्र स्थापन करण्याबाबत वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नागरिकांना शब्द दिला होता. त्यांनी दिलेला शब्द महिनाभराच्या कालावधीत पूर्ण केला आहे. राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने १७ मार्च रोजी या बाबतचा शासन निर्णय निर्गमित केलाआहे.मानोरा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र स्थापन करण्याची मागणी अनेक दिवसांपासून सुरू होती. सन २००५ पासून वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही मागणी शासन दरबारी रेटून धरली होती. विधानसभेच्या माध्यमातूनही त्यांनी या मागणीचा पाठपुरावा केला होता. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश प्राप्त झाले आहे. मानोरा सह नजिकच्या कवडजई, किन्ही, ईटोली, आसेगाव, गिलबिली, मोहाडी तुकुम, कोरटी तुकुम आदी गावांना या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून आरोग्य सेवेचा लाभ मिळणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी)समस्या सुटणारमानोरा हे गाव परिसरातील मध्यवर्ती ठिकाण असल्याने येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची मागणी कित्येक दिवसांपासून सुरू होती. ही मागणी आता मार्गी लागली आहे.