शेतकऱ्यांच्या वतीने सभापतींना निवेदन

By Admin | Updated: October 16, 2015 01:34 IST2015-10-16T01:34:34+5:302015-10-16T01:34:34+5:30

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात धान्य खरेदी विक्री आणि तारण योजना त्वरित सुरु करावी,..

Appeal to the Speaker on behalf of the farmers | शेतकऱ्यांच्या वतीने सभापतींना निवेदन

शेतकऱ्यांच्या वतीने सभापतींना निवेदन

चंद्रपूर : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात धान्य खरेदी विक्री आणि तारण योजना त्वरित सुरु करावी, या मागणीचे निवेदन कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनिर्वाचीत सभापती प्रभाकर सेलोकर यांना शेतकरी बांधवांकडून देण्यात आले.
यापूर्वी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने बाजार समितीच्या बाहेर धान्य खरेदी विक्रीचे व्यवहार होत असत. या व्यवहारामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण होत आहे. याकरिता नियमाप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाहेर धान्य खरेदी विक्रीचे व्यवहार होत असत. या व्यवहारामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण होत आहे. याकरिता नियमाप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात धान्य खरेदी विक्रीचे व्यवहार व्हावेत, अशी मागणी राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नेते अ‍ॅड. गोविंद भेंडारकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी सभापतींना निवेदनाद्वारे केली.
शेतकरी वर्गासाठी खासदार निधीतून उभारलेल्या शेतकरी भवनात तातडीने पूर्णत्वास न्यावे. शेतकरी वर्गाला धान्य साठविण्यासाठी भांडार गोदाम उपलब्ध करुन देण्यात यावे. तारण योजनेंतर्गत मालाच्या किमतीच्या ७५ टक्के एवढी रक्कम शेतकरी वर्गाला त्यांच्या धान्यावर देण्यात यावी, या मागण्याही निवेदनातून करण्यात आल्या. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Appeal to the Speaker on behalf of the farmers