शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

आनंदवनला दरवर्षी पाच लाखांचा निधी देणार

By admin | Updated: December 11, 2015 01:40 IST

कर्मयोगी बाबा आमटे यांनी आनंदवनाची स्थापना मोजक्याच कुष्ठरोग्यांना घेवून केली. आज आनंदवनाचे कार्य सातासमुद्रापार पोहचले असल्याने देश-विदेशातील पर्यटक आनंदवनात येतात.

बाळू धानोरकर यांची घोषणा : विकास कामांना मिळणार गतीवरोरा : कर्मयोगी बाबा आमटे यांनी आनंदवनाची स्थापना मोजक्याच कुष्ठरोग्यांना घेवून केली. आज आनंदवनाचे कार्य सातासमुद्रापार पोहचले असल्याने देश-विदेशातील पर्यटक आनंदवनात येतात. त्याचा ताण आनंदवनावर पडत आहे. आनंदवनातील विकास कामे व्हावीत याकरीता आनंदवनाला दरवर्षी आमदार निधीतून पाच लाख रुपये देण्याची घोषणा आमदार बाळू धानोरकर यांनी आनंदवनात आयोजित मोतीबिंदु शस्त्रक्रिया शिबिराच्या समारोपप्रसंगी केली.यावेळी मुंबईच्या जे.जे. रुग्णालयाचे डीन पद्मश्री डॉ. टी. पी. लहाने, जे.जे. रुग्णालयाच्या नेत्र शस्त्रचिकित्सक डॉ. रागीनी पारेख, आनंदवनचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय पोळ, महारोगी सेवा समिती आनंदवनचे विश्वस्त सुधाकर कडू उपस्थित होते. कर्मयोगी बाबा आमटे यांनी स्थापन केलेल्या आनंदवनात आज कुष्ठरोगी, अंध, अपंग, वयोवृद्ध आदी मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहेत. आनंदवनात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर, जुळलेली अवयवे दूर करण्याचे शिबिर, डोळ्यातील तिरपेपण काढण्याचे शिबिर दरवर्षी आयोजीत करण्यात येते. या शिबिराचा लाभ परिसरातील हजारो नागरिक घेवून आपले आरोग्य टिकवत आहे. या सोबतच आनंदवनाचे कार्य सातासमुद्रापलीकडे गेल्याने आनंदवनचे कार्य बघण्याकरीता देशविदेशातील नागरिकांची सतत वर्दळ असते. अशाही परिस्थितीत कर्मयोगी बाबांचे कार्य आज आनंदवनातील तिसरी पिढी वाहुन घेत आहे. याचे आमदार बाळू धानोरकर यांनी कौतुक करीत आनंदवनाला दरवर्षी पाच लाख रुपयाचा निधी आमदार निधीतून देण्याची घोषणा केली. याबाबत आमदार धानोरकर यांनी प्रस्तावही मागीतले आहे. (तालुका प्रतिनिधी)