शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

शासनाची तूर खरेदीची घोषणा हवेत विरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2017 00:50 IST

काही दिवस शासनाने हमी भाव देऊन तूर खरेदी केली व बंद करून दिली. त्यानंतर ३१ मेपर्यंत तूर खरेदी शासन हमीभावाने करणार असल्याची घोषणा केल्याने ...

भाव गडगडले : हजारो क्विंटल तूर शेतकऱ्याकडे शिल्लक, शेतकरी चिंतातूरप्रविण खिरटकर । लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : काही दिवस शासनाने हमी भाव देऊन तूर खरेदी केली व बंद करून दिली. त्यानंतर ३१ मेपर्यंत तूर खरेदी शासन हमीभावाने करणार असल्याची घोषणा केल्याने शेतकऱ्याच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. परंतु या घोषणेला पाच दिवसांचा कालावधी लोटूनही शासनाने तूर खरेदीबाबत बाजार समित्यांना लेखी अद्यापही कळविले नाही. त्यामुळे शासनाची तूर खरेदीची घोषणा हवेत विरणार तर नाही ना, अशी चर्चा तूर उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आहे.यावर्षी तुरीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले. शेतकऱ्यांनी तूर बाजारात आणल्यावर खुल्या बाजारात तुरीचे भाव गडगडले. त्यामुळे तुर उत्पादक शेतकरी हवालदिल झाला. शासनाने तुरीकरिता पाच हजार ५० रूपये हमीभाव जाहीर केला. परंतु कित्येक दिवस शासनाने तुर हमीभावाने खरेदी करणारे केंद्र सुरू केले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली गरज भागविण्यासाठी हमीभावापेक्षा कमी दराने तुरी विकल्या. त्यानंतर शासनाने अनेक केंद्र हमीभावाने तुर खरेदीसाठी सुरू केले. हमीभाव पाच हजार पाचशे रूपये प्रति क्विंटल मिळत असल्याने शासनाच्या तुर खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली. तुरीच्या वजनाकरिता कित्येक दिवस शेतकऱ्यांना ताटकळत राहावे लागले. तरीही शेतकऱ्यांनी यातना सहन केल्या. मात्र शासनाने तुर खरेदी बंद केली. परंतु आजही हजारो क्विंटल तुर शेतकऱ्यांच्या घरात पडुन आहे. त्यामुळे शासनाने पाच दिवसांपुर्वी ३१ मेपर्यंत तुर शासन खरेदी करेल, अशी घोषणा केली. बाजार समित्यांकडून तत्काळ अहवाल मागून घेतला. परंतु एक एक दिवस घोषणेनंतर लोटत आहे व तुर खरेदीची ३१ मे ही तारीख जवळ येत आहे. परंतु शासनाने अद्यापही बाजार समित्यांना लेखी आदेश दिले नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढत आहे. दिवसा गणीक बाजार समिती कार्यालयात जावून तुर खरेदी केव्हा सुरू होणार, याची चौकशी शेतकरी करीत आहे. परंतु असे कोणतेही निर्देश आले नसल्याचे समितीचे म्हणणे आहे.सातबाऱ्यावर नमूद असणे आवश्यकनाफे ड केंद्रावर तुर विक्रीसाठी आणत असताना पेरीव पत्र म्हणजेच सातबाऱ्यावर तूर पेरल्याचे नमुद असणे आवश्यक आहे. अन्यथा अशा तुर स्विकारल्या जाणार नाही. यामुळे तुर शिल्लक असलेले शेतकरी सातबारा पेरीव पत्र काढून सज्ज झाले असल्याचे दिसून येत आहे. या सक्तीमुळे शेती नसलेले परंतु तुर विक्री करण्याकरिता नाफे डमध्ये येणाऱ्या शेतकऱ्यांना लगाम बसणार असल्याचे मानले जात आहे.तातडीने तूर खरेदी करावी शेतकऱ्याकडे हजारो क्विंटल तुरी शिल्लक आहे. खुल्या बाजारात अत्यल्प दराने तूर विकावी लागत असल्याने शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागत आहे. नव्याने येणाऱ्या शेतीच्या हंगामाकरिता शेतकऱ्यांना पैशाची गरज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी तूर नाफे डमार्फ त तातडीने खरेदी करणे सुरू करावे, यासाठी वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीने शासनाकडे पत्रव्यवहार केला आहे. त्यामूळे शासनाने तातडीने तूर खरेदी करून तूर उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.विशाल बदखल , सभापती.गोंधळ उडण्याची शक्यताकाही दिवस बंद असलेली नाफेड खरेदी सुरू करण्याची घोषणा शासनाने केली. याला पाच दिवसांचा कालावधी लोटत आहे. ज्यादिवशी तुर खरेदी केंद्र सुरू होईल, त्या दिवशी मोठ्या प्रमाणात आवक येईल. त्यामूळे गोंधळ उडण्याची शक्यता आहे.