शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

ऐन दिवाळीत गॅस सिलिंडर टंचाई

By admin | Updated: October 22, 2014 23:16 IST

सर्वत्र दिवाळीची धूम सुरू आहे. गॅस सिलिंडरचा वापरही मोठ्या प्रमाणात होतो. मात्र, मागील काही दिवसांपासून गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

चंद्रपूर : सर्वत्र दिवाळीची धूम सुरू आहे. गॅस सिलिंडरचा वापरही मोठ्या प्रमाणात होतो. मात्र, मागील काही दिवसांपासून गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. खरोखरच गॅस टंचाई आहे की, गॅस एजंसीधारकांनी कृत्रिम टंचाई निर्माण केली, असा प्रश्न निर्माण होत आहे. सिलिंडरसाठी नागरिक एजन्सीसमोर लांबच लांब रांग लावत आहे. तासन्तास रांगेत उभे राहिल्यानंतरही सिलिंडर मिळत नसल्याने ऐन सणासुदीच्या दिवसावर विरजन पडत आहे. दिवाळी सण १० ते १२ दिवसांचा असतो. या दिवसात प्रत्येक घरी खाद्यपदार्थ बनविले जातात. पाहुण्यांची रेलचेल असते. त्यामुळे सणासुदीच्या दिवसातच सिलिंडरची मागणी असते. या दिवसात प्रत्येकजण अतिरिक्त सिलिंडर भरुन ठेवतात. मात्र, सिलिंडरची कमतरता दिसून येत असून नंबर लावल्यानंतरही गॅसधारकांना सिलिंडर वेळेवर मिळत नाही. गॅस सिलिंडरची घरपोच सेवा आहे. त्यामुळे प्रत्येक सिलिंडरधारकाचे गॅस एजन्सीच्या वाहनाकडे लक्ष लागून आहे. मात्र, सिलिंडर घेऊन येणारे वाहनच येत नसल्याने नागरिकांचा मनस्ताप वाढत आहे. ज्यांनी १५-२० दिवसांपूर्वी नंबर लावले, त्यांनाही गॅस सिलिंडर न मिळाल्याने नागरिकच गॅस एजन्सीत येत आहेत.गॅस सिलिंडर एजन्सीला त्यांच्या आवश्यक कोट्यानुसार सिलिंडरचा पुरवठा केला जातो. मग सिलिंडरचा तुटवडा कसा निर्माण होतो, असा प्रश्न ग्राहकांनी केला आहे. विशेष म्हणजे सणासुदीच्या दिवसातच नेहमी सिलिंडरचा पुरवठा निर्माण होत असल्याने एजंसीच्या कार्यपद्धतीवर आणि संबंधित विभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. आॅनलाईन बुकिंगची पद्धत असल्याने अनेकजण आॅनलाईन बुकिंग करतात. परंतु, गर्दीचे कारण पुढे करुन आॅनलाईन बुकिंग करणाऱ्याला सिलिंडर दिले जात नाही. त्यांना एजंन्सीमध्ये बोलाविले जाते. एजन्सीमध्ये गेल्यावर पुन्हा गर्दीचे कारण पुढे करुन दुसऱ्या दिवशी येण्यास सांगितले जाते. असा प्रकार सिलिंडरधारकांसोबत सुरु असल्याने ग्राहकांमध्ये संताप आहे. विशेष म्हणजे संबंधित विभागाला या प्रकारची संपूर्ण माहिती असताना याकडे दुर्लक्ष केले जात आहे. (स्थानिक प्रतिनिधी)