शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: ५ राज्यांमध्ये 'सत्ता'धीश कोण?, आज होणार फैसला; पश्चिम बंगालकडे सगळ्यांचे लक्ष
2
बंगालमध्ये तृणमूल-भाजपामध्ये अटीतटीची लढत, सुरुवातीच्या कलांमध्ये कुणाला आघाडी? अशी आहे आकडेवारी
3
Tamil Nadu Elections 2026: विजय थलपती ते खुशबू सुंदर... पडद्यावरच्या कलाकारांची प्रतिष्ठा पणाला, कोण मारणार बाजी?
4
भाजपासाठी पश्चिम बंगाल ठरणार 'लास्ट फ्रंटियर'; जय-पराजयाचा परिणाम 'मिशन UP' वर पडणार?
5
Post Office ची कमाई करुन देणारी स्कीम, जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
6
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
7
'राजा शिवाजी'चं वीकेंड कलेक्शन किती? समोर आले आकडे; मराठी प्रेक्षकांची मान उंचावली
8
पश्चिम बंगालमधील या दोन मतदारसंघात 'कांटे की टक्कर', निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष
9
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
10
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
11
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
12
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
13
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
14
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
15
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
16
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
17
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
18
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
19
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
20
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडी इमारतीला भेगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 00:30 IST

आईच्या शाळेनंतर मुलांना अक्षरांची ओळख होते ती अंगणवाडीमध्ये. खरेतर शिक्षणाचा पाया भक्कम होतो, ...

धोक्याची शक्यता : चिमुकल्यांचा जीव टांगणीलाआशीष घूमे। लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : आईच्या शाळेनंतर मुलांना अक्षरांची ओळख होते ती अंगणवाडीमध्ये. खरेतर शिक्षणाचा पाया भक्कम होतो, तो याच ठिकाणी. मात्र वरोरा शहरापासून काही अंतरावर असणाऱ्या येन्सा या गावातील अंगणवाडीची परिस्थिती पहिल्यानंतर येथे शिक्षणाचा पायाच धोक्यात असल्याचे दिसत आहे. या अंगणवाडीच्या इमारतीला सर्वत्र भगदाड पडले असून ही इमारत धोकादायक असतानाही चिमूरडे जीव मुठीत घेऊन अक्षरे गिरवित आहेत.एकीकडे शासनाकडून डिजीटल इंडियाचा उदोउदो होत असताना येन्सा या गावातील अंगणवाडीचे विद्यार्थी जीव मुठीत घेवून शिक्षणाचे धडे गिरवत आहेत. एकूणच या अंगणवाडीची परिस्थिती पाहता कसा होणार इंडिया डिजीटल, असा प्रश्न येथील गावकऱ्यांच्या मनात उपस्थित होत आहे.देशात सर्वत्र कान्व्हेंट संस्कृतीचा बोलबाला झाला आहे. शहरी भागासोबतच ग्रामीण भागातील पालकांचाही कल कान्व्हेंटकडे वळत आहे. अगदी नर्सरीपासूनच पालक आपल्या मुलांचा दाखला इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये करीत आहेत. कधीनव्हे ती अलिकडे ग्रामीण परिसरात अशी परिस्थिती दिसून येत आहे. मात्र गरीब पालकांना हा खर्च परवडणारा नाही. त्यामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील गरीब शेतमजूर वर्ग आर्थिक परिस्थितीमुळे आपल्या पाल्यानां अंगणवाडीत पाठवित आहेत. मात्र अंगणवाड्यांची इमारतच कोसळण्याच्या स्थितीत असल्याने आपल्या मुलांना घरीच ठेवणे बरे, असे आता पालक म्हणू लागले आहेत.गेल्या पाच वषार्पासून या इमारतीला पाडून नवीन इमारत बांधण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. मात्र ग्रामपचांयत प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिक करीत आहे. याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.