शंकर लोधीच्या गुफा उलगडणार चंद्रपूरचा प्राचीन इतिहास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:30 IST2020-12-06T04:30:20+5:302020-12-06T04:30:20+5:30

अतिदुर्गम माणिकगड पहाडावर वसलेली ८०-९० गावे समाविष्ठ करून जिवती तालुक्याची निर्मिती झाली. या तालुक्यात शंकर लोधी हे ३० घरांचे ...

The ancient history of Chandrapur will unfold in the cave of Shankar Lodhi | शंकर लोधीच्या गुफा उलगडणार चंद्रपूरचा प्राचीन इतिहास

शंकर लोधीच्या गुफा उलगडणार चंद्रपूरचा प्राचीन इतिहास

अतिदुर्गम माणिकगड पहाडावर वसलेली ८०-९० गावे समाविष्ठ करून जिवती तालुक्याची निर्मिती झाली. या तालुक्यात शंकर लोधी हे ३० घरांचे गाव अनेक वर्षांपासून दुर्लक्षित आहे शंकर लोधी गावाला लागून एक नैसर्गिक गुफा आहे. जैवविविधतेच्या दृष्टीने त्याचे महत्त्व आहे. पर्यटस्थळ म्हणूनही अद्भूत अशी नैसर्गिक रचना बघणे आनंददायक आहे. चुनखडी आणि सॅण्ड स्टोनच्या मिश्रणाचे या जमिनीत पाणी मुरल्याने अशा गुफा तयार होतात, असे अभ्यासक सांगतात. चंद्रपूरपासून सुमारे १०० किलोमीटर अंतरावर हे गाव आहे. जाण्यासाठी स्वतंत्र वाहनच उत्तम पर्यायआहे. त्यातही चारचाकी वाहन असल्यास अधिक बरे. तीव्र उतार चढाव असून रस्त्यांची स्थिती खराब आहे. या गुफेचा अभ्यास केल्यास प्राचीण इतिहास पुढे येऊ शकतो.

अशी आहे गुफा

गुफेमध्ये सुमारे १०० फूट आत गेल्यावर गुफेत पाणी आढळते. परंतु तेवढ्या भागातही गुफेच्या छताला लटकलेले लवण स्तंभ पाहायला मिळते. उन्हाळ्यात गुफेत बरेच आत जाता येते. ज्यांनी आत जाण्याचा प्रयत्न केला, ते सुमारे एक किलोमीटरपर्यंत जाऊ शकतात. आत अंधार, जागोजागी पाणी व प्राणवायूची कमी असल्याने साधनांशिवाय जाणे कठीण आहे. मात्र, या एक किलोमीटर परिसरात अत्यंत निर्मळ पाण्याचे प्रवाह, जमीन व छतावर असलेले लवण स्तंभ, भूलभुलय्यासारखे चकवा देणारे रस्तेही गुफेत आहेत.

कोट

नुकतीच नोव्हेंबर महिन्यात या गुफेला भेट देऊन लहानसा भाग पाहण्याचे धाडस केले. स्वत:ला छत्तीसगडपेक्षा प्रगत समजणाऱ्या महाराष्ट्र व तेलंगणा या दोन्ही राज्यांकडून शंकर लोधीच्या या गुफेची अक्षम्य उपेक्षा सुरू आहे. संवर्धन व विकास तर सोडाच नकाशातदेखिल हे गाव नोंदविण्यात आले नाही.

-किशोर जामदार, अभ्यासक चंद्रपूर

Web Title: The ancient history of Chandrapur will unfold in the cave of Shankar Lodhi