शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमात सुधारणा; मंत्रिमंडळाचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 13:29 IST

महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ मध्ये दुरूस्ती तसेच सुधारणा करण्याचा निर्णय मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

ठळक मुद्देचंद्रपूर, गडचिरोली, वर्धा जिल्ह्यासाठी कायदा कडक

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर, गडचिरोली आणि वर्धा या तीन दारूबंदी असलेल्या जिल्हयांमध्ये अवैध मद्यउत्पादन, वाहतुक व विक्री याबाबत उपाययोजना करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ मध्ये दुरूस्ती तसेच सुधारणा करण्याचा निर्णय मंत्रीमंडळाच्या  बैठकीत घेण्यात आला आहे.शासनाने वर्धा, गडचिरोली व चंद्रपूर हे तीन जिल्हे पूर्णपणे कोरडे जिल्हे म्हणून घोषित केले आहे. चंद्रपूर जिल्हयात दारूबंदी घोषित करण्यात आल्यानंतर या तिन्ही जिल्हयाच्या सीमा क्षेत्रालगत असलेल्या जिल्हयांचा विशेष कोरडा विभाग तयार करण्यात आला असून त्यानुसार महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ मध्ये सुधारणा करण्यासाठी प्रस्ताव मंत्रीमंडळाच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आला व या प्रस्तावाला आज मंत्रीमंडळाने मान्यता दिली आहे. यामध्ये प्रामुख्याने पूर्णत: दारूबंदी असलेल्या क्षेत्रासाठी शिक्षेच्या विद्यमान तरतुदीची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. याआधी सहा महिन्यांची असलेली शिक्षा आता तीन ते सात वर्षापर्यंत होणार असून २५ हजार रू. दंडाची शिक्षा आता एक लाख रू. ते पाच लाख रू. पर्यंत करण्यात आली आहे. लगतच्या जिल्हयातून अनुज्ञाप्तीधारकांकडून मद्य येवू नये म्हणून जे अनुज्ञाप्तीधारक शासनाने जाहीर केलेल्या संपूर्ण कोरडया क्षेत्रात मद्य पाठवतील त्यांची अनुज्ञाप्ती यापुढे रद्द करण्यात येणार आहे. अवैध मद्यविक्रीच्या धंद्यामध्ये लहान मुलांचा व महिलांचा वापर करण्याचे प्रयत्न चालु आहेत. तसेच या अवैध व्यवसायावर मोठया प्रमाणावर आर्थिक फायदा होत असल्यामुळे समाजकंटक सहभागी झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण झालेले आहे. तसेच या जिल्हयांमध्ये शासकीय अधिकारी गुन्हा अन्वेषणाची कामे करीत असताना त्यांच्यावर हल्ले झालेले आहेत, त्यांच्याविरूध्द खोटे गुन्हे दाखल करण्याचे प्रयत्नसुध्दा झालेले आहेत. ही बाब लक्षात घेता शिक्षेच्या तरतुदीत वाढ करण्यात आली आहे.

टॅग्स :alcohol prohibition actदारुबंदी कायदा