अंबुजा प्रकल्पग्रस्तांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 10:30 PM2018-07-14T22:30:09+5:302018-07-14T22:30:28+5:30

कोरपना तालुक्यातील उपरवाही येथील अंबुजा सिमेंट कंपनीअंतर्गत येणाऱ्या १२ गावांतील प्रकल्पग्रस्तांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून समस्यांकडे लक्ष वेधले. आंदोलनाचे नेतृत्व प्रहारचे जिल्हाध्यक्ष पप्पू देशमुख यांनी केले.

Ambuja project affected District Collectors | अंबुजा प्रकल्पग्रस्तांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे

अंबुजा प्रकल्पग्रस्तांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोरपना तालुक्यातील उपरवाही येथील अंबुजा सिमेंट कंपनीअंतर्गत येणाऱ्या १२ गावांतील प्रकल्पग्रस्तांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून समस्यांकडे लक्ष वेधले. आंदोलनाचे नेतृत्व प्रहारचे जिल्हाध्यक्ष पप्पू देशमुख यांनी केले.
जिल्हाधिकाºयांनी ४५ दिवसांत अंबुजाची चौकशी करून न्याय देण्याचे लेखी आश्वासन दिले होते. मात्र १०० दिवसांचा कालावधी लोटूनही चौकशी समितीने अहवाल सादर केला नाही. त्यामुळे चौकशीची प्रक्रिया थांबवून प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.
अंबुजा सिमेंट कंपनीने १२ गावांतील आदिवासींची जमीन अधिग्रहण करताना पेसा कायद्यातील तरतुदीचे पालन केले नाही. जमीन अधिग्रहण करताना ग्रामसभेची मान्यता घेणे आवश्यक आहे. प्रकल्पग्रस्तांना नोकरीचे आश्वासन दिले. मात्र २० वर्षे लोटूनही आश्वासनाची पूर्तता झाली नाही. आदिवासींची फसवणूक करणाºया कंपनीविरोधात अ‍ॅट्रासिटी अ‍ॅक्टअंतर्गत कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
मागण्याचे निवेदन उपजिल्हाधिकाऱ्यांना (पुनर्वसन) देण्यात आले. आंदोलनात रिंकू पाटील, ठोंबरे, शंकर नेणारे, आकाश लोंढे, प्रवीण मटाले, सचिन पिंपळशेंडे, संदीप परकर, फिरोज खान पठाण, किशोर महाजन, धर्मेंद्र शेंडे, अनिल कोयचाळे, लक्ष्यपती येलेवार, सतीश खोब्रागडे, घनश्याम येरगुडे, निलेश पाझारे आदी सहभागी झाले होते. बंगाली कॅम्प चौकातील अपघातात मृत पावलेल्या युवतीला यावेळी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

Web Title: Ambuja project affected District Collectors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.