शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

लाॅकडाऊनच्या काळात बंद असलेल्या सर्वच बसेस सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:30 IST

चंद्रपूर विभागाअंतर्गत चंद्रपूर, राजुरा, वरोरा, चिमूर आगार येतात. या आगारांतून दररोज हजारो प्र‌वासी प्रवास करतात. लाॅकडाऊनमध्ये बसेस बंद करण्यात ...

चंद्रपूर विभागाअंतर्गत चंद्रपूर, राजुरा, वरोरा, चिमूर आगार येतात. या आगारांतून दररोज हजारो प्र‌वासी प्रवास करतात. लाॅकडाऊनमध्ये बसेस बंद करण्यात आल्या होत्या. दरम्यान, उत्पन्नवाढीसाठी महामंडळाने प्रवासी बसेसना मालवाहतूक बसमध्ये रूपांतरित करून आर्थिक भार पेलण्याचा प्रयत्न केला. आता हळूहळू कोरोनावर मात करून परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे महामंडळाने पूर्ण क्षमतेने बसेस सुरू केल्या आहेत. त्यामुळे सामान्य प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये प्रवासाचे एकमेव साधन एसटी आहे. त्यामुळे या भागाकडेही महामंडळाने लक्ष केंद्रित केले आहे.

लाॅकडाऊनच्या काळात प्रवाशांचे मोठे हाल झाले. अनेकांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागला. यामध्ये प्रवाशांचे आर्थिक नुकसान झाले. मात्र आता लोकवाहिनी असलेली एस.टी. पुन्हा रस्त्यावर धावू लागल्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

-

बाॅक्स

प्रवाशांची अडचण झाली दूर

जिल्ह्यातील सर्वच मार्गांवरील एसटी सुरू झाली आहे. त्यामुळे प्रवाशांची अडचण दूर झाली आहे. चंद्रपूर-नागपूर, चंद्रपूर-घुग्घुस, वणी, चंद्रपूर-गडचिरोली, ब्रह्मपुरी या मार्गांवर नियमित आणि वेळेवर बस सोडली जात आहे. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला असून आगारांनाही आर्थिक उत्पन्न मिळत आहे. मात्र ज्या मार्गावर बस धावत नाहीत, त्या मार्गावरील प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.

-

कोट

राजुरा येथून गोवरी, मार्डा येथील बस सुरू झाली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. लाॅकडाऊनमध्ये ही बस बंद होती. त्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मात्र ही बस वेळेवर आणि नियमित सोडावी.

- गोविल इटणकर, गोवरी

---

कोट

नागभीड येथून व्याहाड तसेच इतर गावांसाठी बससेवा सुरू झाली आहे. अद्यापही काही गावांत बस जात नाही. त्यामुळे याकडे आगारप्रमुखांनी लक्ष देऊन बस नियमितपणे सुरू करावी. तसेच लांब पल्ल्याच्या बसेस अधिकाधिक सोडण्याचा प्रयत्न करावा.

- नारायण पाचपोर, नागभीड

---

कोट

---

लाॅकडाऊननंतर आता परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे आगारातून नियमित बसेस सोडल्या जात आहेत. शहरी तसेच ग्रामीण भागातील प्रवाशांचा याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

- सचिन डफरे

आगारप्रमुख, चंद्रपूर

---

बाॅक्स

सर्वच आगारांची बससेवा रुळांवर

चंद्रपूर विभागांतर्गत चंद्रपूर, वरोरा, राजुरा, चिमूर असे आगार असून ब्रह्मपुरी आगार गडचिरोली विभागांतर्गत आहे. दरम्यान, चंद्रपूर विभागातील सर्वच आगारांतील बसेस रुळावर आल्या असून सर्वच बस नियमित धावत आहे. त्यामुळे महामंडळाच्या आर्थिक उत्पन्नात भर पडली आहे.