शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
3
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
4
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
5
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
6
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
7
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
8
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
9
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
10
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
11
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
12
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
13
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
14
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
15
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
16
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
17
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
18
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
19
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
20
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
Daily Top 2Weekly Top 5

अजनी ट्रॅव्हल्सची झाडाला धडक

By admin | Updated: April 3, 2016 03:50 IST

तळोधी (बा.) पासून चार किलोमिट अंतरावर असलेल्या वलनी या गावाजवळ प्रवासी घेवून जाणाऱ्या अंजनी ट्रॅव्हल्सची झाडाला धडक बसली.

वलनी येथील घटना : एकाचा मृत्यू तर १० प्रवासी गंभीर जखमीतळोधी (बा.) : तळोधी (बा.) पासून चार किलोमिट अंतरावर असलेल्या वलनी या गावाजवळ प्रवासी घेवून जाणाऱ्या अंजनी ट्रॅव्हल्सची झाडाला धडक बसली. यात एका प्रवाशाचा मृत्यू झाला तर चालकासह १० प्रवासी गंभीर जखमी झाले. ही घटना आज शनिवारी घडली. चक्रधर वसंता खोब्रागडे (३०) रा. तळोधी (बा.) असे मृताचे नाव आहे. आज दुपारच्या सुमारास नागपूर- मूल अंजनी ट्रॅव्हल्स (क्रमांक एम.एच.३१- सी. १०११) प्रवासी घेवून सुसाट वेगाने मूलकडे जात होते. या ट्रॅव्हल्सचा चालक मद्य पिऊन असल्याचे समजते. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने वलनी गावाजवळील एका सिंदीच्या झाडाला त्याने धडक दिली. धडक एवढी भिषण होती की, ट्रॅव्हल्ससमोरील भागाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आणि चालकाजवळील कॅबीनमध्ये बसलेल्या दिलीप तातोबा उपरीकर (५०) ,बंडू मनोहर कोहिले (४५), बंजू नारायण गेडाम (५०), पार्वताबाई जयंत कटारिया (५०), जयंतीभाई माधव कटारिया (५५), पार्वता शंकर मेश्राम (४०), चक्रधर वसंता खोब्रागडे (३०), नारद तिवारी, सोमदेव बाबुलाल नान्हे, राजेश सतीबावणे आदी गंभीररित्या जखमी झाले. यात चक्रधर वसंता खोब्रागडे व नारद तिवारी हे दोघेही कॅबीनमध्ये बसलेले असताना हे दोघेही कॅबीनच्या डाव्या बाजुला फसले. हे दोघे प्रवासी बाहेर निघू शकत नव्हते. त्यांना पाणी पाजत गॅस वेल्डींगच्या सहाय्याने टिनाचे चादर कापून काढण्याचा प्रयत्न केला.एक तास प्रयत्न करुनसुद्धा प्रवासी निघू शकले नाही. शेवटी जेसीबीच्या सहाय्याने ट्रॅव्हसचा समोरील भाग उचलून चालक व कॅबीनमध्ये फसलेल्या प्रवाशांना काढण्यात यश आले. चक्रधर खोब्रागडे व नारद तिवारी या दोघांच्या पायाला गंभीर जखम असल्याने त्यांना गडचिरोलीला हलविण्यात आले. काही जखमी प्रवाशांना प्राथमिक स्वास्थ्य केंद्र तळोधी (बा.) येथे उपचाराकरिता हलविण्यात आले तर काही प्रवाशांना चंद्रपूरला हलविण्यात आले. यावेळी सिंदेवाही व नागभीड येथून जखमी प्रवाशांना हलविण्यासाठी १०८ क्रमांकावरील तीन अ‍ॅम्बूलन्स उपलब्ध झालेल्या होत्या. घटनास्थळी लोकांची प्रचंड गर्दी झालेली होती. यावेळी तळोधी (बा.) पोलीस स्टेशनचे ठाणेदार सोनवणे यांच्या मार्गदर्शनात अनिल आंबेकर, पोलीस हवालदार झलके, सहाय्यक फौजदार वंजारी, जगनसिंह साथी यांनी मदत केली. अंजनी ट्रॅव्हल्सच्या चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान चक्रधर वसंता खोब्रागडे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. (वार्ताहर)