शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ११ ठिकाणी आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2020 05:00 IST

लॉकडाऊन काळातील सर्व वीज बिल माफ करण्यात यावे आणि पुढे दोनशे युनिटपर्यंत वीज मोफत देण्यात यावी, यासह अन्य मागण्यांसाठी शुक्रवारी विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे जिल्ह्यात ठिकठिकाणी वीज बिल वापसी आंदोलन करण्यात आले. जिल्ह्यातील हजारो नागरिकांनी आपले भरमसाठ आलेले वीज बिल महावितरणच्या उपविभागीय अभियंता व वीज अधिकारी कार्यालयात परत केले.

ठळक मुद्देवीज बिल माफ करा : बिल केले महावितरणला परत

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : लॉकडाऊन काळातील सर्व वीज बिल माफ करण्यात यावे आणि पुढे दोनशे युनिटपर्यंत वीज मोफत देण्यात यावी, यासह अन्य मागण्यांसाठी शुक्रवारी विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे जिल्ह्यात ठिकठिकाणी वीज बिल वापसी आंदोलन करण्यात आले. जिल्ह्यातील हजारो नागरिकांनी आपले भरमसाठ आलेले वीज बिल महावितरणच्या उपविभागीय अभियंता व वीज अधिकारी कार्यालयात परत केले.शुक्रवारी दुपारी १२ वाजता जिल्ह्यातील चंद्रपूर, राजुरा, कोरपना, गोंडपिपरी, जिवती, भद्रावती, वरोरा, मूल, सावली, पोंभुर्णा या तालुकास्थळी आणि गडचांदूर अशा ११ ठिकाणी समितीचे कार्यकर्ते व नागरिक मोठया संख्येने आपले वीज बिल घेऊन गेले आणि तेथे अधिकाऱ्यांना कोरोना काळात भरमसाठ वीज बिल आल्याचे सांगून ते परत केले.या आंदोलनाचे नेतृत्व गोंडपिपरी येथे माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप, अरुण वासलवार, व्यंकटेश मल्लेलवार, तुकेश वानोडे, डॉ. संजय लोहे, रेखा राठोड, चंद्रपूर येथे किशोर पोतनवार, मितीन भागवत, हिराचंद बोरकुटे, गोपी मित्रा, अनिल दिकोंडवार, दिवाकर माणूसमारे, राजुरा येथे अ‍ॅड. मुरलीधर देवाळकर, मधुकर चिंचोलकर, प्रभाकर ढवस, वरोरा येथे अ‍ॅड. शरद कारेकर, भद्रावती येथे सुधीर सातपुते, प्रा.सचिन सरपटवार, राजू बोरकर, कोरपना येथे अरुण नवले, रमाकांत मालेकर, सावली येथे गोपाल रायपूरे, मनोहर गेडाम, मूल येथे कवड्ड येनप्रेडीवार यांनी केले. गडचांदूर येथे प्रभाकर दिवे, मदन सातपुते, पोंभुर्णा येथे गिरीधरसिंह बैस, बबन गोरंटीवार व जिवती येथे नीलकंठ कोरांगे, अ‍ॅड. श्रीनिवास मुसळे यांनी केले. सर्व कार्यालयात वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारले.या आहेत मागण्यालॉकडाऊन काळात दोनशे युनिटपर्यंत वीज पुरवठा मोफत करण्यात यावा, सध्या दिलेली बिले परत घ्यावीत, विजेचा उत्पादन खर्च अडीच रुपये असताना घरगुती वापराकरिता सरासरी साडेसात रुपये बिलाची प्रति युनिट आकारणी केली जाते आणि औद्योगिक वापराकरिता प्रति युनिट साडेअकरा रुपये दर आकारले जातात. ही दोन्ही दरे निम्मे करण्यात यावे, गेल्या तीन वर्षांपासून विदर्भात दुष्काळ असल्यामुळे कृषिपंपाचे सर्व थकीत वीज बिल माफ करण्यात यावे, शेतीला पूर्ण वेळ पूर्ण दाबाची वीज पुरविण्यात यावी, मागेल त्याला तत्काळ वीज पुरवठा करण्यात यावा आणि विदर्भातील लोडशेडींग संपविण्यात यावी, या मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.

टॅग्स :electricityवीजmahavitaranमहावितरण