शहरं
Join us  
Trending Stories
1
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
2
आजचे राशी भविष्य: १२ मे २०२६: आर्थिक लाभ होईल, आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होईल
3
हिमाचल-उत्तराखंडमध्ये जलप्रलय! मुसळधार पाऊस आणि गारपिटीने जनजीवन विस्कळीत; कोट्यवधींचे नुकसान
4
संकट : एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; शेअर बाजार कोसळला, रुपया तळाला
5
इर्शाळवाडी ट्रेक ठरला जीवघेणा; डोंबिवलीतील २० वर्षीय रितेशचा मृत्यू, तरुणासोबत नक्की काय घडलं?
6
विशेष लेख: भगव्या बंगालमध्ये सगळ्यांना ‘भाकरी’ मिळेल का?
7
बाजारात 'सुवर्ण' धास्ती, देशाला बचतीची संधी; देशाला 'आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी' बनवण्याचा निर्धार
8
टिटवाळ्यात एक हजार चाळी बेकायदा, भूमाफियांकडे दुर्लक्ष; केडीएमसी महापालिकेसह पोलिसांचाही कानाडोळा
9
अन्वयार्थ: न्यायालय म्हणते, बोगस दिव्यांग ‘काळी मेंढरे’ सेवेतून हाकला !
10
लेख: शहरांनी सुरळीत धावण्यासाठी त्यांच्या पायांना कसली चाकं हवीत?
11
अग्रलेख: युद्धाच्या झळा, काटकसरीच्या कळा
12
युद्धाचा भडका उडणार? अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा 'तो' प्रस्ताव फेटाळला, चिंता वाढली
13
मुंबईसह राज्यातील दुकाने, हॉटेल्स, मॉल्स २४ तास सुरू का नाहीत? उद्योग मंत्रालयाने निर्णय घेऊनही अंमलबजावणी नाही
14
अंबरनाथमध्ये आता शिंदेसेनेने भाजपपुढे ठेवला युतीचा प्रस्ताव, राजकीय खेळीची भाजपकडून चाचपणी
15
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
16
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
17
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
18
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
19
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
20
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

चार दिवसानंतर शेतकऱ्यांनी उपोषण सोडले

By admin | Updated: December 11, 2014 23:05 IST

सेल्लुर नागरेड्डी येथील मामा तलावाचे पाणी शेतीसाठी उपसा करण्यास मज्जाव करीत असलेल्या मच्छी ठेकेदारावर कारवाई न करता, शेती पिकास धोका निर्माण करणाऱ्या संवर्ग विकास

पोंभूर्णा : सेल्लुर नागरेड्डी येथील मामा तलावाचे पाणी शेतीसाठी उपसा करण्यास मज्जाव करीत असलेल्या मच्छी ठेकेदारावर कारवाई न करता, शेती पिकास धोका निर्माण करणाऱ्या संवर्ग विकास अधिकाऱ्याला तत्काळ निलंबिंत करण्यात यावे आदी मागण्यांसाठी पोंभूर्णा येथे शेतकऱ्यांनी उपोषण सुरु केले होते. उपमुख्य कार्यकारी अधिकारी राठोड यांनी शेतकऱ्यांना लेखी आश्वासन दिल्याने शेतकऱ्यांनी चार दिवसानंतर आज उपोषण सोडले.
पोंभूर्णा तालुक्यातील सेल्लुर नागरेडी व वेळवा येथील शेतकरी रघुनाथ सोमा बांबोळे व इतर सहा शेतकरी आपल्या शेतातील धानपिकास ५७ सर्व्हे नंबर मधील मामा तलावाचे पाणी उपसा करण्यासाठी लेखी निवेदन देऊन पंचायत समिती पोंभूर्णा व संबंधित कार्यालयाकडे मागणी केली होती.
या मागण्यांची पुर्तता न झाल्याने ८ डिसेंबरला शेतकऱ्यांनी उपोषणाला सुरुवात केली. याची दखल घेऊन आज दुपारी ११ वाजता चंद्रपूर जि.प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राठोड, तहसीलदार राजेश सरवदे, ठाणेदार डी.आर. डोलारे यांनी उपोषणकर्त्यांला भेट देऊन त्यांच्याशी चर्चा केली.
सदर प्रकरणाची चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्यात येईल. सदर प्रकरणाची दोन महिन्याच्या कालावधीच्या आत मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. चंद्रपूर यांचेकडून समिती नेमून चौकशी करण्यात येईल, असे उपोषणकर्त्यांला आश्वासन दिले. त्यामुळे शेतकऱ्यांनी उपोषण १२ वाजता उपोषण सोडले.
यावेळी विस्तार अधिकारी सावसाकडे, जोनमवार, तलाठी लोणकर, पोंभूर्णा तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष सचिन रणदिवे यांच्यासह पदाधिकारी, शेतकरी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)