शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

अखेर ‘त्या’ रिंग रोडच्या कामाला स्थगिती

By admin | Updated: March 31, 2015 01:11 IST

बायपास मार्गावरून जाणाऱ्या रिंग रोडच्या बांधकामासाठी महानगरपालिकेने पुढाकार घेतला होता.

मुनगंटीवार यांनी वेधले लक्ष : मुख्यमंत्र्यांचे मनपा आयुक्तांना निर्देशचंद्रपूर : बायपास मार्गावरून जाणाऱ्या रिंग रोडच्या बांधकामासाठी महानगरपालिकेने पुढाकार घेतला होता. या अंतर्गत या मार्गावर येणाऱ्या नागरी वस्तीतील सातशे घरांना पाडण्याची नोटीस मनपाने बजावली आहे. याचा धसका सर्वच नागरिकांनी घेतला होता. मात्र पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार व आ. नाना श्यामकुळे यांनी या कार्यवाहीला स्थगिती देण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लावून धरली. अखेर मुख्यमंत्र्यांनी यात हस्तक्षेप करून ही कार्यवाही स्थगित करून अहवाल तात्काळ पाठविण्याचे आयुक्तांना आज सोमवारी आदेश दिले.तुकूम येथील प्रस्तावित चंद्रपूर शहरातील रिंग रोड बांधकामासाठी मनपाने कंबर कसली आहे. यासाठी महापालिकेने ७०० घरांना पाडण्याची काही दिवसांपूर्वी नोटीसही बजावली आहे. तुकूम, निर्माण नगर, आक्केवार वाडी, महेश नगर, वृंदावन नगर, राष्ट्रवादी नगर, वानखेडे वाडी, नेहरूनगर आदी परिसराचा यात समावेश आहे. या नोटीसमुळे येथील नागरिकांमध्ये प्रचंड धास्ती पसरली आहे. याबाबत आ. नाना श्यामकुळे, सुभाष कासनगोट्टूवार व नगरसेविका अमरजितकौर धुन्ना यांनी तात्काळ मनपा आयुक्त, अर्थमंत्री यांना निवेदन पाठवून ही बाब अन्यायकारक असल्याचे म्हटले होते. नागरिकांचा रोष बघून अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही यात हस्तक्षेप घेतला. चंद्रपूर मनपाचा विकास आराखडा १९८४ ला सादर केला असताना या रस्त्यासंदर्भात कुठलीही कार्यवाही त्यात नमूद नव्हती. शिवाय बांधकामाला लागणारा निधी अंदाजे २७५ कोटी शासनाने न दिल्यामुळे रिंग रोडचे बांधकाम केले नाही. या जागेवर सातशे पक्की घरे ३० वर्षांपासून आहेत. विकास आराखड्यात ते दाखविले नसून तो रिंग रोड नाही तर वळण रस्ता असल्याची बाब अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार व आ. नाना श्यामकुळे यांनी आज मुंबई येथील एका बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून दिली. याची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही पक्के घरे पाडण्यात येऊ नये, या कामाला तात्काळ स्थगिती देऊन अहवाल आपणाकडे पाठविण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी मनपाच्या आयुक्तांना दिले आहे. मुख्यमंत्र्यांच्या या आदेशामुळे पीडित सातशे कुटुंबांना दिलासा मिळाला आहे. (शहर प्रतिनिधी)