शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
2
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
3
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
4
चीनने इराणला पाठवले मिसाईल्ससाठीचे केमिकल्स, अमेरिकेने पकडलेल्या जहाजात सापडला साठा; निक्की हेलींचा दावा
5
Latest Marathi News LIVE Updates: भाजपाने मतदारसंघ पुनर्रचना केलेल्या अधिकाऱ्यांनाच नोकरीवर घेतले, रोहित पवारांचा आरोप
6
अरे बापरे! मोमोज खाणं ठरलं जीवघेणं; १० वर्षांच्या मुलीचं लिव्हर फेल, आठवेना, चालताही येईना
7
ट्रम्प आता पाकिस्तानचेही ऐकेनात, इराणला दिली उघड धमकी; म्हणाले, “करार होत नाही तोपर्यंत...”
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या कोट्यवधीच्या प्रॉपर्टीवर येणार तात्पुरती टाच; 'अशी' होणार कुटुंबियांची अडचण
9
सोलापूर-पुण्याहूनही सुटणार पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन? जाणून घ्या, कुठे जाणार अन् थांबणार!
10
MHADA Lottery: गिरणी कामगारांच्या २,५२१ घरांच्या लॉटरीला विलंब लागण्याची चिन्हे 
11
जिनिलियाचं रितेशवरील प्रेम पाहून भारावली भाग्यश्री, 'राजा शिवाजी' सेटवरचा किस्सा सांगत म्हणाली...
12
Video - संतापजनक! "तू क्यूट दिसतेस, एकटीच राहतेस का?"; रॅपिडो ड्रायव्हरचा तरुणीला मेसेज
13
Apple च्या CEO पदी नियुक्ती; कोण आहेत जॉन टर्नस? टिम कुक यांची जागा घेणार...
14
IPL 2026: सूर्यकुमार यादवचा 'फ्लॉप शो' सुरूच, ६ पैकी ५ सामन्यात 'फेल'; MI संघाबाहेर काढणार?
15
Mamata Banerjee : "माझं विमान रनवेवर मुद्दाम ३० मिनिटं थांबवलं, याचा बदला घेऊ"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
16
Vastu Tips: वारंवार येणारे अडथळे आणि आर्थिक चणचण? वास्तुशास्त्राचे 'हे' सोपे उपाय ठरतील रामबाण!
17
लग्नसराईपूर्वी सोन्या-चांदीत घसरण; जाणून घ्या तुमच्या शहरातील ताजे दर...
18
ट्रम्प यांच्या धमकीवर इराणचे प्रत्युत्तर, नेते म्हणाले, “आम्ही अजून सर्व पत्ते उघडले नाहीत”
19
Unseasonal Rain: ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट... पनवेल, नवी मुंबई, रायगडात पावसाची हजेरी, नागरिकांची तारांबळ
20
“जिथे कोणी जात नाही तिथे मी जातो”; DCM शिंदेंचा दुर्गम भागापर्यंत विकास पोहोचवायचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

ब्रह्मपुरीतील ‘त्या’ खड्ड्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी द्यावे शपथपत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2019 06:00 IST

ब्रह्मपुरी येथील नागरे हॉस्पिटलला लागून असलेल्या परिसरात माजी नगरसेवकाचे पुत्र साहब लाखानी यांनी स्वत:ची इमारत बांधण्याकरिता ७० फुट लांब ४० फुट रूंद असा २० फुट खोल खड्डा खोदला होता. यासाठी त्यांनी नगरपरिषदेकडून परवानगीच घेतली नव्हती. या खड्ड्याच्या बाजूला अनेक इमारती आहे. पावसामुळे या खड्ड्यात पाणी भरले होते.

ठळक मुद्देउच्च न्यायालयाचा आदेश : मुख्याधिकाऱ्यांनाही ठरविले जबाबदार

लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : आॅगस्ट महिन्याच्या प्रारंभी ब्रह्मपुरी शहरातील डॉ. नागरे हॉस्पिटलजवळ परवानगी न घेता मोठा खड्डा खोदण्यात आला होता. नागरिकांनी यासंदर्भात मुख्याधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही कारवाई केली नाही. त्यामुळे नागरिकांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली. या प्रकरणात न्या. आर. के. देशपांडे व न्या. विनय जोशी यांनी न. प. च्या मुख्याधिकाºयांना दोषी ठरविले. शिवाय, काहीच कारवाई न झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांनीही शपथपत्र दाखल करावे, असे आदेश दिला. या आदेशामध्ये जिल्हा प्रशासनात खळबळ उडाली आहे.ब्रह्मपुरी येथील नागरे हॉस्पिटलला लागून असलेल्या परिसरात माजी नगरसेवकाचे पुत्र साहब लाखानी यांनी स्वत:ची इमारत बांधण्याकरिता ७० फुट लांब ४० फुट रूंद असा २० फुट खोल खड्डा खोदला होता. यासाठी त्यांनी नगरपरिषदेकडून परवानगीच घेतली नव्हती. या खड्ड्याच्या बाजूला अनेक इमारती आहे. पावसामुळे या खड्ड्यात पाणी भरले होते. त्यामुळे जवळच असलेल्या गणेश कात्यायन, श्रीपाद जोशी व प्रतीक रत्नपारखी यांची घरे कोसळण्याचा धोका निर्माण झाला होता. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी लाखानीविरूद्ध मुख्याधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. कारवाईच्या नावावर लाखानीला तीनदा नोटीस बजावण्यात आली. परंतु, नगर परिषद प्रशासनाने खड्डा बुजविण्याची कारवाईच केली नाही. परिणामी तक्रारकर्त्यांनी नगर परिषदेच्या निष्क्रियतेविरूद्ध उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात याचिका दाखल केली.न्या. आर. के. देशपांडे, न्या. जोशी यांनी सुनावणीदरम्यान परिसरातील नागरिकांचे सार्वजनिक हित लक्षात घेऊ न नगर परिषदेच्या मुख्याधिकाºयांना दोषी ठरविले. विशेष म्हणजे या प्रकरणात प्रशासनाने काय कार्यवाही केली, याबाबत जिल्हाधिकाºयांनी न्यायालयात शपथपत्र दाखल करावे, असा आदेश दिला आहे.अखेर माजी नगरसेवकपुत्रावर फौजदारी गुन्हानगर परिषदेकडे तक्रार करूनही खड्डा खोदणाºयावर कारवाई झाली नाही. त्यामुळे नागरिकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने मुख्याधिकाºयांना जबाबदार धरून जिल्हाधिकाºयांनी शपथपत्र दाखल करण्याचा आदेश दिला. दरम्यान नगरपरिषद प्रशासनाच्या तक्रारीवरून माजी नगरसेवकाचे पुत्र साहब लाखानी याच्याविरूद्ध ब्रह्मपुरी पोलिसांनी फौजदारी गुन्हा दाखल केला आहे.