शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
2
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
3
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
4
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
5
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
6
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
7
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
8
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
9
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
10
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
12
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
13
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
14
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
15
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
16
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
17
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
18
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
19
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
20
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
Daily Top 2Weekly Top 5

तिसऱ्या लाटेसाठी प्रशासन लागले कामाला; आपण, सावधान केव्हा होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2021 05:00 IST

कोरोना लाट ओसरताच शासनाने सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत निर्बंध शिथिल करताना नागरिकांना त्रिसूत्री पाळण्याचे आवाहन केले होते. मात्र, काहीजण याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करीत आहेत. आता पुन्हा निर्बंधात शिथिलता आणली. रात्री ८ वाजतापर्यंत नियमावलीनुसार आस्थापनांना सूट दिली आहे. आतातर अनेकजण चेहऱ्यावर मास्क लावताना दिसत नाहीत. गर्दीत बिनदिक्कत वावरताना दिसत आहेत.

राजेश भोजेकरलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट तीव्र होती. ही लाट थोपविताना अनेकांचा बळीही गेला. आता तिसरी लाटही उंबरठ्यावर आहे. दुसरीकडे शासनाकडून निर्बंध शिथिल होत असे असले तरी जिल्हा प्रशासनाची ही  लाट थोपविण्यासाठी युद्धपातळीवर तयारी सुरू आहे. परंतु नागरिकांकडून अपेक्षित काळजी घेतली जात नसल्याचे चित्र आहे. कोरोना लाट ओसरताच शासनाने सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत निर्बंध शिथिल करताना नागरिकांना त्रिसूत्री पाळण्याचे आवाहन केले होते. मात्र, काहीजण याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करीत आहेत. आता पुन्हा निर्बंधात शिथिलता आणली. रात्री ८ वाजतापर्यंत नियमावलीनुसार आस्थापनांना सूट दिली आहे. आतातर अनेकजण चेहऱ्यावर मास्क लावताना दिसत नाहीत. गर्दीत बिनदिक्कत वावरताना दिसत आहेत.हीच बाब तिसऱ्या लाटेसाठी कारणीभूत ठरण्याची भीती व्यक्त होत आहे. ही भीती लक्षात घेऊन जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणा तिसरी लाट थोपविण्यासाठी धडपडत आहे. या लाटेत सर्वाधिक कोरोना संक्रमण लहान मुलांना होईल, असे भाकीत वर्तविले जात आहे.निर्बंध शिथिल असले तरी नागरिकांनी आतापासूनच स्वत:सह आपल्या मुलांची काळजी घेतली नाही तर परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.ऑक्सिजन प्लांटच्या कामाला गतीजिल्ह्यात दुसऱ्या लाटेतील विदारक स्थिती लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने आरोग्य विभागाच्या माध्यमातून तिसऱ्या लाटेत या अडचणी येऊ नये म्हणून तीन ऑक्सिजन प्लांटचे काम युद्धपातळीवर हाती घेतले आहे. सामान्य रुग्णालय परिसरात एक व महिला रुग्णालय परिसरात एक अशा दोन प्लांटचे काम सुरू आहे. या प्लांटमध्ये हवेतून गॅसेस ऑक्सिजनचा पुरवठा रुग्णांना पाईपलाईनच्या माध्यमातून थेट होईल. हा प्लांट रुग्णांसाठी अतिशय महत्वाचा ठरणार आहे.

तिसरा प्लांट एअर सेप्रेशन युनिटतिसरा प्लांट म्हणजेच एअर सेप्रेशन युनिटची निर्मिती केली जात आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नवीन बांधकाम सुरू असलेल्या परिसरात हा प्लांट उभारला जात आहे. एका दिवशी ५०० ऑक्सिजन सिलिंडर भरून देण्याची क्षमता या प्लांटची आहे. या सिलिंडरचा पुरवठा जिल्हाभरात केला जाणार आहे. यामुळे मोठ्या खर्चाची बचत होणार आहे. या युनिटला क्रायजेनिक ऑक्सिजन जनरेट प्लांट असेही म्हणतात. हवेतून लिक्विड तयार होते. लिक्विडचे रुपांतर गॅसेसमध्ये होईल. मग सिलिंडरमध्ये भरून रुग्णालयांना त्याचा पुरवठा केला जाईल, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. निवृत्ती राठोड यांनी ‘लोकमत’ला दिली.

१०० बेडचे रुग्णालय मुलांसाठी तयार होतेयमोठ्या व्यक्तींनी काळजी घेतली नाही तर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संसर्ग लहान मुलांना मोठ्या प्रमाणावर होईल, अशी भीती व्यक्त होत आहे. काही नागरिक स्वत:ची काळजी घेताना दिसत नसल्यामुळे त्यांना कोरोनाची लागण होऊन इतरांना संसर्ग होईल. यामध्ये लहान मुले मोठ्या प्रमाणावर कोरोना बाधित होतील. ही भीती लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने महिला रुग्णालयात मुलांसाठी १०० बेडच्या ऑक्सिजनची सुविधा असलेल्या रुग्णालयाचे काम सुरू आहे. यामध्ये २५ व्हेंटिलेटर  बेड असतील, अशी माहितीही डाॅ. निवृत्ती राठोड यांनी दिली.