जिल्ह्यात नव्या ४८ कोरोना बाधितांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2020 05:00 IST2020-08-23T05:00:00+5:302020-08-23T05:00:43+5:30

शनिवारी चंद्रपूर शहरात सर्वाधिक १९ बाधित पुढे आलेले आहे. त्याचबरोबर, बल्लारपूर येथील ५, राजुरा, भद्रावती, वरोरा येथील प्रत्येकी दोन, कोरपना येथील आठ, चिमूर, सिंदेवाही, जिवती, ब्रह्मपुरी, मूल येथील प्रत्येकी एक, गोंडपिपरी येथील पाच बाधित ठरले आहे. असे एकूण ४८ बाधित पुढे आले आहे.

Addition of 48 new corona victims in the district | जिल्ह्यात नव्या ४८ कोरोना बाधितांची भर

जिल्ह्यात नव्या ४८ कोरोना बाधितांची भर

ठळक मुद्देआणखी एकाचा मृत्यू : एकूण बाधित पोहचले १३५४ वर

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यात शनिवारी ४८ नवे बाधित पुढे आले असून जिल्ह्यातील बाधितांची संख्या १३५४ वर पोहोचली आहे. यापैकी सध्या ४४७ बाधितांवर उपचार सुरू आहे. तर ८९३ बाधित बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. दरम्यान बल्लारपूर येथील ७९ वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. जिल्ह्यात मोठया संख्येने अ‍ॅन्टिजन चाचणी सुरू असून लक्षणे दिसून आल्यास तपासणी करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
मृतक हे गणपती वार्ड, बल्लारपूर येथील रहिवासी असून त्यांना कोरोना व्यतिरिक्त श्वसनाचा आजार व न्युमोनिया होता. त्यांना २० ऑगस्टला दुपारी १२.३५ वाजता रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. २१ ऑगस्टच्या रात्री १ वाजता अर्थात शनिवारी पहाटे मृत्यू झाल्याचे आरोग्य यंत्रणेने स्पष्ट केले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १४ बाधितांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील १२ तर तेलंगणा आणि बुलडाणा येथील प्रत्येकी एका बाधिताचा मृत्यू झाला आहे.
शनिवारी चंद्रपूर शहरात सर्वाधिक १९ बाधित पुढे आलेले आहे. त्याचबरोबर, बल्लारपूर येथील ५, राजुरा, भद्रावती, वरोरा येथील प्रत्येकी दोन, कोरपना येथील आठ, चिमूर, सिंदेवाही, जिवती, ब्रह्मपुरी, मूल येथील प्रत्येकी एक, गोंडपिपरी येथील पाच बाधित ठरले आहे. असे एकूण ४८ बाधित पुढे आले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरू असून २१ जुलै ते २१ ऑगस्ट या दरम्यान कोरोनाबाधितांची संख्या ९१७ ने वाढली आहे. चंद्रपूरात कोरोनाने खुप उशिरा शिरकाव केला असला तरी त्याची संख्या झपाट्याने वाढली आहे.
विशेष म्हणजे, २१ जुलै रोजी चंद्रपूर जिल्ह्यात केवळ ३०९ कोरोना रूग्णांची संख्या होती. यात एकही रूग्ण दगावला नव्हता. परंतु आता तब्बल एक महिन्यानंतर १३५४ रूग्ण झाले असून यात १२ जणांनी आपला जीव आतापर्यंत गमावला आहे. नागरिकांनी नियमांचे पालन न केल्यास पुढील काळात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढेल यात शंकाच नाही.

Web Title: Addition of 48 new corona victims in the district