शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

युरिया जास्त भावाने विकल्यास कारवाई

By admin | Updated: September 16, 2014 23:38 IST

जिल्ह्यात चालु महिन्यामध्ये ५ हजार १०० मेट्रिक टन युरीया खतासाठी शासनाकडे मागणी केली आहे. यातील २६ हजार मेट्रिक टन जिल्ह्यात उपलब्ध झाले आहे. उर्वरित खत येत्या तीन ते चार दिवसामध्ये

चंद्रपूर: जिल्ह्यात चालु महिन्यामध्ये ५ हजार १०० मेट्रिक टन युरीया खतासाठी शासनाकडे मागणी केली आहे. यातील २६ हजार मेट्रिक टन जिल्ह्यात उपलब्ध झाले आहे. उर्वरित खत येत्या तीन ते चार दिवसामध्ये उपलब्ध होणार आहे. तालुकानिहाय खताचा पुरवठा करण्यात आला आहे. त्यामुळे यावेळी युरिया खताची टंचाई जिल्ह्यात नसून शेतकऱ्यांनी आवश्यक मात्रेतच पिकांना युरिया खत द्यावे. नत्रयुक्त खताच्या अतिवापरामुळे पिकांवर परिणाम पडतो. त्यामुळे मर्यादित खत वापरून पिकांची निगा राखावी, असा सल्ला कृषी विभागाने शेतकऱ्यांना दिला आहे. जिल्ह्यातील काही कृषी केंद्र संचालक खताची कृतिम टंचाई दाखवून शेतकऱ्यांची लूट करीत असेल तर, अशा केंद्र संचालकांची शेतकऱ्यांनी तक्रार करावी, शेतकऱ्यांनी कोणत्याही परिस्थितीत जास्त पैसे देवून खत खरेदी करू नये, असेही कृषी विभागाने म्हटले आहे. जिल्ह्यातील सावली, गोंडपिपरी, मूल, ब्रह्मपुरी, गोंडपिपरी आदी तालुके धानासाठी प्रसिद्ध आहे. तर, राजुरा, कोरपना, वरोरा, भद्रावती या तालुक्यांमध्ये कापूस तसेच इतर पिके घेतल्या जाते. यावर्षी उशिरा आलेल्या पावसामुळे पिकांची उंची प्रमाणापेक्षा कमी आहे. त्यामुळे बहुतांश शेतकरी खताची मात्र वाढवून देत आहे. अशावेळी कृषी केंद्र संचालक शेतकऱ्यांना खताची टंचाई असल्याचे भासवून जास्त भावाने युरिता खत विकतात. यात शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी सर्तक राहणे गरजेचे आहे. सोबतच अतिमात्रेत खतही पिकांने देणे धोकादायक ठरू शकते.चालू महिन्यांमध्ये कृषी विभागाने ५ हजार १०० मेट्रीक टन युरिया खताची आयुक्तालयाकडे नोंदणी केली आहे. यातील २६ हजार मेट्रीक टन खत जिल्ह्यात पोहचले आहे. या खताचे वितरणही तालुकानिहाय करण्यात आले आहे. काही तालुक्यात रॅक उपलब्ध नसल्याने या तालुक्यांमध्ये खत पुरवठा करण्यासाठी काही कालावधी लागतो. हिच संधी बघत कृषी संचालक शेतकऱ्यांची लूट करतात. (नगर प्रतिनिधी)